मुंबई, 8 सप्टेंबर- बॉलिवूडच्या(Bollywood) ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीनीं (Shabana Azmi) पती जावेद अख्तरला(Javed Akhatar) ट्रोल करणाऱ्यांवर निशाना साधला आहे. नुकताच जावेद अख्तर यांनी काँग्रेस नेता शशी थरूर(Shashi Tharoor) यांची खिल्ली उडवली होती. त्त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत होतं. यावर उत्तर देत शबाना आझमीनी सर्वांची बोलती बंद केली आहे.
नुकताच शशी थरूर एका कार्यक्रमामध्ये किशोर कुमार यांचं ‘एक अजनबी हसीना से’ हे गाणं गाताना दिसले होते. हा व्हिडीओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेयर केला होता. त्यांनतर शशी थरूर यांना विविध प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. दरम्यान गीतकार जावेद अख्तर यांनीसुद्द्धा कमेंट केली होती. मात्र यामध्ये त्यांनी शशी थरूर यांची खिल्ली उडवली होती.
And all those trolls just chill . Shashi Tharoor is a good friend and Javed’s remark was in pure jest ! https://t.co/NsYKOPyM1a
— Azmi Shabana (@AzmiShabana) September 7, 2021
शशी थरूर यांच्या गाण्याचा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते चकित झाले होते. तर दुसरीकडे जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या काही हिंदी शब्दांच्या उच्चाराची खिल्ली उडवली होती. तसेच या व्हिडीओवर जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करत, ‘शशी हे खूप गोड आहे.’ असं म्हटलं होतं.
After the cultural programme by Doordarshan Srinagar for the Parliamentary Standing Committee on Information Technology, I was persuaded to sing for the Members. Unrehearsed and amateur but do enjoy! pic.twitter.com/QDT4dwC6or
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 6, 2021
तसेच त्यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे. ‘सर्व ट्रोलर्सनी फक्त चिल करा. शशी खूप चांगले मित्र आहेत. जावेदची ती प्रतिक्रिया ही फक्त एक विनोद होता’.
शशी थरूर यांनी स्वतःच्या गाण्याचा व्हिडीओ शेयर करत, त्याला ‘अनरिहर्सल आणि आवड’ तरीसुद्धा सर्वांनी याचा आस्वाद घ्या’ असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Shabana Azami