मुंबई, 17 मार्च: बॉलीवूड(bollywood) अभिनेता सुशांत सिंह रजपूत(sushant singh rajput) मृत्यूप्रकरण(death) म्हटलं कि सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्ती(reha chakraborty). सुशांत सिंहची गर्लफ्रेंड असणारी रिया त्याच्या मृत्युनंतर अनेक आरोपांमुळे गेल्या वर्षभर चर्चेत राहिली आहे. सुशांतच्या आत्महत्येबद्दल (sucide)अनेक कयास लावले जात होते. यामध्ये सर्वात जास्त आरोप रियावर लागले होते. सुशांत सोबत राहण्यापासून ते सुशांतला ड्रग्स(drugs) देण्यापर्यंत अशा अनेक आरोपांखाली रियाकड बघितलं जात आहे. इतकचं नव्हे तर सुशांत मृत्यूप्रकरणातून वेगळं वळणं मिळालेलं प्रकरण म्हणजे बॉलिवूड ड्रग्स रकेट यात अनेक अभिनेत्रींची चौकशी केली गेली. या प्रकरणात रिया आणि रियाच्या भावाला दोषी सुद्धा सिद्ध करण्यात आलं होतं.
रियानं ड्रग्स प्रकरणात 1 महिना तुरुंगात घालवला आहे. सध्या ती जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. मात्र याचा परिणाम तिच्या चित्रपट करिअरवर झालेला दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच बहुचर्चित ‘चेहरे’(chehare) या चित्रपटाची काही पोस्टर्स (posters)प्रदर्शित झाली आहेत. बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि इमरान हश्मीसोबत रियासुद्धा या चित्रपटात झळकणार होती. मात्र या पोस्टर्समधून रिया चक्रवर्तीला डच्चू मिळाल्याचं दिसून आलं. चित्रपटाच्या एकाही पोस्टर्समध्ये रिया झळकलेली नाही. किंवा यात रियाचं नावसुद्धा नाही.
यामुळे रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया चक्रवर्तीला या चित्रपटातून काढून टाकल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहेत. याबद्दल बोलताना ‘चेहरे’ चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी आपला मौन सोडला आहे. ‘मिड डे’ मध्ये आलेल्या एका वृत्तानुसार आनंद यांनी म्हटलं आहे. की रियाबद्दल सध्या काहीही बोलता येणार नाही. योग्य वेळ आल्यावर त्याबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या जातील. आता आम्ही रियाबद्दल काहीही बोलू शकत नाही.
(हे वाचा:अरुण जेटलींची भाची आहे ही टीव्ही अभिनेत्री; असे सुंदर PHOTO पाहून चाहते घायाळ)
त्याचबरोबर असंही सांगितलं जात आहे, की रिया चक्रवर्तीचा परिणाम चित्रपटाच्या यशावर होऊ शकतो. सध्या रियाची प्रतिमा ही नकारात्मक बनली आहे. सुशांतचे चाहते अजूनही रियावर चिडून आहेत. रियावर सोशल मीडियावरून रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणूनबुजून रियाला ‘चेहरे’च्या प्रोमोशन पासून अलिप्त करण्यात आलं आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केलं आहे. हा एक रहस्यमयी, थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, क्रिस्टल डिसुझा, सिद्धांत कपूर, रघुबीर यादव अशी तगडी स्टारकास्ट आहे. आता या चित्रपटात रिया झळकणार कि नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.