जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दादा मला एक वहिनी आण; श्रद्धा कपूरच्या भावाने केला निर्मात्याच्या मुलीशी साखरपुडा

दादा मला एक वहिनी आण; श्रद्धा कपूरच्या भावाने केला निर्मात्याच्या मुलीशी साखरपुडा

दादा मला एक वहिनी आण; श्रद्धा कपूरच्या भावाने केला निर्मात्याच्या मुलीशी साखरपुडा

अभिनेता (Actor) शक्ती कपूरच्या (Shakti Kapoor) घरात नुकताच साखपुडा (Engagement)आटोपला असून सगळं कुटुंब आता लग्नाच्या (Wedding) जोरदार तयारीला लागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर : 2020 ला सेलिब्रिटी वेडींग (Celebrity Wedding) इयर म्हणून घोषित केलं तरी वावगं ठरणार नाही. नेहा कक्कर (Neha Kakkar), आदित्य नारायण (Aditya Narayan), पुनीत पाठक (Punit Pathak), क्रिकेटर युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) नुकतेच लग्न बंधनात अडकले. येणाऱ्या काळातही बॉलीवूडची बरीच मंडळी लग्नबंधनात अडकणार आहे. लवकरच अभिनेता शक्ती कपूरच्या (Shakti Kapoor) घरातही सनई चौघडे वाजणार असल्याची बातमी पुढे येत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ प्रियांक शर्मा (Priyank Sharma) लवकरच त्याच्या लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड शजा मोरानी (Shaza Morani) बरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियांकचा नुकताच शजा बरोबर साखरपुडा आटोपला आहे. प्रियांक आणि शाजाचा  साखरपुडा संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत धुमधडाक्यात पार पडला. शजा मोरानी (Shaza Morani) सुप्रसिद्ध प्रोड्यूसर करीम मोरानीची (Karim Morani) मुलगी आहे. तसेच प्रियांक शर्मा हा श्रद्धा कपूरचा मावसभाऊ असून  80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेंचा (Padmini Kolhapure) मुलगा आहे. आई पद्मिनी मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. पद्मिनी कोल्हापुरे श्रद्धा कपूरची आई शिवांगी कपूरची (Shivangi Kapoor) धाकटी बहीण आहे. श्रद्धा कपूरचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूरने प्रियांकच्या साखरपुड्याची फोटो त्याच्या सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. सिद्धांताने या फोटोला कॅप्शन दिला आहे ‘जगातील माझी सगळ्यात 2 आवडती लोकं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, अभिनंदन मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे’. सिद्धांतच्या या पोस्ट वर हजारो लाईक्स मिळाले असून बऱ्याच सेलिब्रिटिंनी  प्रियांक आणि  शजाला त्यांच्या नवीन आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

साखरपुड्याला  (Engagement) कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रच उपस्थित होते. साखरपुड्यात  शाजा खूपच सुंदर दिसत होती. तिने गुलाबी रंगाचा पायजामा आणि पिवळ्या रंगाचा दुप्पट्याने नारंगी रंगाचा मिड-स्लिट कुर्ता घातला होता,ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत होती.   पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात प्रियांक आणि  शजा लग्नबंधनात अडकतील  असा अंदाज वर्तविला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात