फॅशन डिवा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका ही नेहमीच तिच्या हाॅट लुकमुळे आणि मादक अदांमुळे चर्चेत असते. वयाच्या 46 व्या वर्षीही मलायका चांगलीच फिट आणि फाईन आहे. 46 व्या वर्षीही ती चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ करते. मलायकानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोंमुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. मलायकानं पांढऱ्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हेवी वर्क, स्ट्रीपी ब्लाऊज घातलेल्या साडीत मलायका खूपच हाॅट दिसत आहे. न्यूड मेकअपमध्ये हाॅट पोझ देत मलायकानं हे शूट केलं आहे. हातामध्ये क्लच पकडून नवे फॅशन गोल सेट करताना मलायका पहायला मिळाली. मलायका अनेक कारणांवरुन चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर फिरत असतात.