जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कंगनाचा पुन्हा एकदा पारा चढला; आता तर थेट ट्विटरच्या CEO ला सुनावले खडेबोल

कंगनाचा पुन्हा एकदा पारा चढला; आता तर थेट ट्विटरच्या CEO ला सुनावले खडेबोल

कंगनाचा पुन्हा एकदा पारा चढला; आता तर थेट ट्विटरच्या CEO ला सुनावले खडेबोल

America violence: अमेरिकेचे (America) मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President donald trump) यांच्यावर ट्वीटरने (twitter) कारवाई करत यांचं ट्वीटर अकाऊंट कायमचं बंद (ban) केलं आहे. यामुळे आता हा वाद वाढत चालला आहे. या वादात आता कंगना रणौतनेही (Kangana ranaut) उडी घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) समाज माध्यमांवर फारचं सक्रिय असते. ट्वीटरवर ती नेहमी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. यावेळी तिने थेट ट्विटरच्या CEO वर निशाणा साधला आहे. अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिने हे भाष्य केलं आहे. अलिकडेच ट्विटरने अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई करत यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद केलं आहे. यामुळे आता हा वाद वाढत चालला आहे. आता या वादात कंगना रणौतनेही उडी घेतली आहे. कंगना रणौतने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी वर आपला राग काढला आहे. यावेळी कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये जॅक डोर्सीचं 2015 साली केलेल्या एका ट्वीटला क्वोट केलं आहे. ज्यात त्यानं लिहिलं होतं की - ‘ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. सत्तेच्या विरोधात खरं बोलणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. परस्पर संवाद मजबूत करण्याला आम्ही पाठिंबा देतो.’

जाहिरात

कंगनाने या ट्विटला क्वोट करत लिहिलं की- ‘तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देत नाहीत, इस्लामिक देशांनी आणि चिनी प्रोपगंडासोबत तुम्ही पूर्णपणे विकले गेले आहात. तुम्ही फक्त आपल्या फायद्याच्या बाजूने उभे आहात. तुम्ही इतरांच्या मतांबद्दल असहिष्णुता दर्शवत आहात. तुम्ही तुमच्या लोभांचे गुलाम झाले आहात. त्यामुळं केवळ मोठं मोठे दावे करू नका, हे खूप लज्जास्पद आहे. ’ ट्विटरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यवस्थेवर निशाणा साधण्याची ही कंगनाची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेकांना ट्रोल केलं आहे. तर ट्विटरविरोधातही तिने अनेकदा आपला राग व्यक्त केला आहे. यापूर्वी ट्विटरने अनेकदा कंगनाच्या ट्विटवर कारवाई केली होती. त्यामुळे तिने हा राग व्यक्त केल्याचं अनेकजण म्हणत आहेत. या प्रकरणात अनेकजण कंगनाशी सहमत आहेत,  तर अनेकांनी कंगानाला ट्रोल केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात