अभिनेत्री काजोल आणि तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देवून आपली एक विशिष्ट छाप पाडली आहे. मात्र काजोलची बहीण तनिषा बॉलिवूडमध्ये फारसा कमाल करू शकली नाही. तनिषाने 2003 मध्ये ‘Ssshhh’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. मात्र तिच्या अभिनयाची जादू फारशी चालू शकली नाही. बऱ्याच वर्षापासून ती बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र 2013 मध्ये तनिषाने ‘बिग बॉस 7’ मध्ये सहभाग घेतला होता. आणि या शोमध्ये तिची भेट स्पर्धक आणि अभिनेता अरमान कोहलीशी झाली होती. आणि शोमध्ये हे दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्या अफेयर्सच्या जोरदार चर्चा त्यावेळी चालल्या होत्या. बिग बॉसच्या घरामध्ये हे दोघेही नेहमीच एकमेकांची बाजू घेताना दिसत होते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा हे दोघे एकमेकांच्या सोबत दिसून येत होते. मात्र काही काळानंतर हे दोघेही विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आणि या लव्हस्टोरीचा द एंड झाला. तनिषा आजसुद्धा अविवाहित आहे.