मुंबई,7 मे- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नेहमीच आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक लुकवर नेटकऱ्यांचं बारकाईने लक्ष असतं. या अभिनेत्री सेट असो किंवा एयरपोर्ट नेहमीच आपल्या लुकने सर्वांचं लक्ष केंद्रित करत असतात. या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोणचं (Deepika Padukone) नाव सर्वात वर असतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. दीपिका पादुकोण सतत आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. तिचा एयरपोर्ट लुक नेहमीच सर्वाचं लक्ष वेधून घेत असतो. परंतु अनेकवेळा ती आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोलदेखील होते. दरम्यान आता अभिनेत्री वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सतत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसून येतात. त्यांचे लुक्स सामान्य लोकांच्या समजण्या पलीकडचे असतात. अशातच अनेक अभिनेत्री आपल्या ड्रेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना अस्वस्थ होतात. आणि त्यामुळेच त्या अनेकवेळा उप्स मुव्हमेंटला (Ooops Moment) बळी पडतात. किंवा अनेक अभिनेत्री वार्डरोब मालफ़ंक्शनला बळी पडतात. यावेळी नेटकरी त्यांना चांगलंच धारेवर धरतात. त्यांनतर त्यांचे अनेक वव्हिडीओ आणि फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. नुकतंच अभिनेत्री दीपिका पादुकोण मुंबई एयरपोर्टवर दिसून आली. यावेळी तिने नेहमीसारखं अगदी कॅज्युअल ड्रेस घातला होता. यावेळी अभिनेत्रीने व्हाईट टी शर्ट आणि ग्रे लायनिंगची प्लाजो परिधान केली होती. सोबतच अभिनेत्रीने मोठा साईड बॅग आणि डोळ्यावर सन ग्लासेस कॅरी केले होते. या व्हिडीओमध्ये दीपिका आपल्या कारमधून उतरून एयरपोर्टकडे जाताना दिसून येत आहे. दरम्यान तिला पापाराझींनी घेरलेलं दिसत आहे.
यावेळी दीपिका कारमधून उतरून पापराझींना फोटोसाठी पोज देते. ज्यावेळी ती जायला वळते, तेव्हा तिच्या पारदर्शक ड्रेसमधून इनरवियरची स्ट्रीप रिव्हील होते. या गोष्टीचा दीपिकाला अंदाजही नाही आला. परंतु नेटकऱ्यांनी ते बरोबर हेरलं. त्यांनतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मात्र दीपिकाचे चाहते तिच्या लुकचं कौतुक करत आहेत. इतकंच नव्हे तर अलीकडे आलिया भट्ट तिची स्टाईल कॉपी करत असल्याचंदेखील म्हणत आहेत.