
अभिनेत्री कियारा अडवाणी खुपचं कमी वेळेत मोठी प्रसिद्धी मिळविणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी

31 जुलैला मुंबईमध्ये कियाराचा जन्म झाला होता. ती एका उद्योजक कुटुंबातील मुलगी आहे. तिच्या वडिलांचं नाव जगदीप आडवाणी आणि आईचं नाव जेनेविज जाफरी असं आहे.

कियाराचं खरं नाव कियारा नसून आलिया असं आहे. मात्र बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिनं आपलं नाव बदललं होतं. कारण इंडस्ट्रीमध्ये आधीच आलिया भट्टची एन्ट्री झाली होती. त्यामुळे सलमानने तिला आपलं नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

मात्र सर्व शासकीय कागदपत्रांवर कियाराने आपलं खर नाव म्हणजेच आलिया असंचं लावलं आहे. तसेच सोशल मीडियावरसुद्धा कियारा आणि आडवाणीच्या मध्ये तिने आलिया असं ठेवलं आहे.

कियाराचं सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड शाहीन जाफरीसोबत खुपचं खास नातं आहे. शाहीन ही कियाराची मावशी आहे.

कियाराने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं, की माझी आई सलमान सरांना आधीपासून ओळखते. ते दोघेही बांद्रामध्येचं मोठे झाले आहेत. ते सोबतचं सायकलिंग करायचे.

कियाराचं ज्येष्ठ अभिनेता अशोक कुमारसोबतसुद्धा एक नातं आहे. कियाराची सावत्र आज्जी ही अशोक कुमारांची मुलगी होती.




