आपल्या जबरदस्त डान्सच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण करणारी नोरा फतेही आज आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. आज लोकप्रिय असणाऱ्या नोराने एकेकाळी मोठा स्ट्रगल केला आहे. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
मूळची कॅनेडियन वंशाची असणाऱ्या नोराने आज फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या डान्स मूव्ह्सचे कोट्यवधी चाहते आहेत.
नोराचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ मध्ये कॅनडा येथे झाला होता. अनेक दिवस स्ट्रगल केल्यांनतर नोराने २०१४ मध्ये 'रोर' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
नोरा फतेही बिग बॉस ९ मध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शो मुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
हीच नोरा ज्यावेळी कॅनडा सोडून भारतात आली होती, तेव्हा तिच्या जवळ फक्त ५००० रुपये होते. त्यामुळे तिला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं होतं.
याबद्दल बोलताना नोरा म्हणते, 'मी याकाळात कॉफी शॉपमध्ये काम केलं आहे. तसेच मी अनेकवेळा रडत रडत घरी गेले आहे'.
तसेच नोरा सांगते, त्याकाळात तिला एक असा कास्टिंग डायरेक्टर भेटला होता ज्याने फक्त तिला हिणवलंच नाही तर तिच्या बॉडीवर आणि चेहऱ्यावर वाईट कमेंट्ससुद्धा केल्या होत्या. परंतु आज हीच नोरा एक सुपरस्टार बनली आहे.