मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! मायनस 1 डिग्रीमध्ये शर्टलेस रनिंग करताना दिसला टायगर श्रॉफ; VIDEO पाहून दिशा पाटनी म्हणाली...

OMG! मायनस 1 डिग्रीमध्ये शर्टलेस रनिंग करताना दिसला टायगर श्रॉफ; VIDEO पाहून दिशा पाटनी म्हणाली...

 बॉलिवूड   (Bollyood)   अभिनेता टायगर श्रॉफ   (Tiger Shroff)   हा आपल्या अभिनयापेक्षा जास्त फिटनेससाठी ओळखला जातो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

बॉलिवूड (Bollyood) अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा आपल्या अभिनयापेक्षा जास्त फिटनेससाठी ओळखला जातो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

बॉलिवूड (Bollyood) अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा आपल्या अभिनयापेक्षा जास्त फिटनेससाठी ओळखला जातो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,14  डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollyood)   अभिनेता टायगर श्रॉफ   (Tiger Shroff)   हा आपल्या अभिनयापेक्षा जास्त फिटनेससाठी ओळखला जातो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. टायगर आपल्या फिटनेससाठी खूपच सजग असतो. तो नेहमीच विविध एक्सरसाईज करताना दिसून येतो. नुकताच टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो चक्क मायनस वन डिग्रीमध्ये सर्टलेस रनिंग करताना दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या गुड लुक्ससोबतच फिटनेसवरसुद्धा चाहत्यांच्या नजर खिळलेल्या असतात. टायगर बॉलिवूडमधील सर्वात जास्त फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो सतत नवनवीन एक्सरसाईज करताना दिसून येतो. तसेच तो तासंतास जिममध्ये घाम गाळताना दिसून येतो. अनेक लोक त्याचा फिटनेस फंडा फॉलो करत असतात.

नुकताच टायगर श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या फारच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये टायगर शर्टलेस रनिंग करताना दिसून येत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे टायगर मायनस वन डिग्रीमध्ये ही एक्सरसाईज करत आहे. त्यामुळे सर्वांनाच टायगरच कौतुक वाटत आहे. तर अनेकांना टायगरच्या या धाडसाचं आश्चर्य वाटत आहे.या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने पिवळ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. डोळ्यावर गॉगल्स आणि पायात शूज घातले आहेत. अभिनेत्याचा हा माचो मॅन लूक चाहत्यांना फारच आवडला आहे.तसेच टायगरने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं आहे, 'थोडी नेचर cryotherapy माझ्या दिवसाच्या सुरुवातीसाठी' या व्हिडीओवर अनेक कलाकार मित्र कमेंट्स करून आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनीने LOL अशी कमेंट केली आहे.

टायगर सध्या आपल्या आगामी 'गणपत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र शूटिंगमधून वेळ काढत तो आपल्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देत आहे. टायगर श्रॉफ बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटामध्ये दिसलेला नाहीय. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या त्याच्या 'गणपत' या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. त्यामुळे तो लवकरच चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत अभिनेत्री क्रिती सेनन असणार आहे. चित्रपटातील क्रितीच्या हटके लूकची बरीच चर्चादेखील झाली होती. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. तसेच क्रिती आणि टायगरने 'हिरोपंती' या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

First published:

Tags: Entertainment, Tiger Shroff