मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे सनी देओलची पत्नी!मात्र प्रसिद्धीपासून राहते दूर

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे सनी देओलची पत्नी!मात्र प्रसिद्धीपासून राहते दूर

लंडनमध्ये शिकलेल्या पूजाची सनीसोबत पहिली भेटही लंडनमध्येच (London) झाली होती. त्यानंतर काही काळातच त्यांचे लग्न झाले.

लंडनमध्ये शिकलेल्या पूजाची सनीसोबत पहिली भेटही लंडनमध्येच (London) झाली होती. त्यानंतर काही काळातच त्यांचे लग्न झाले.

लंडनमध्ये शिकलेल्या पूजाची सनीसोबत पहिली भेटही लंडनमध्येच (London) झाली होती. त्यानंतर काही काळातच त्यांचे लग्न झाले.

  मुंबई,19 ऑक्टोबर-   : बॉलिवूड (Bollywood) कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते. बॉलिवूड कलाकारांची प्रेमप्रकरणे, घरगुती गोष्टी यांची चर्चा सतत होत असते. आजकाल सोशल मीडियामुळे तर कोणतीही गोष्ट लपून राहणे शक्य नाही. पण पूर्वीच्या काळात अशा गोष्टी उजेडात येण्यास वेळ लागत असे. अर्थात तेव्हाही बॉलिवूड कलाकारांच्या किश्श्यांची चवीने चर्चा होत असे. त्यावेळचे प्रसिद्ध कलाकार धर्मेंद्र (Dharmendra) यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol wife) हा देखील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. आज सनी देओल 65 वर्षांचा झाला आहे. 19 ऑक्टोबर 1957 रोजी साहनेवाल इथे त्याचा जन्म झाला. सनी देओलने 1983 मध्ये 'बेताब' (Betaab) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट खूप गाजला. यात त्याच्या सोबत अमृता सिंग नायिका होती. तिच्याबरोबर त्याच्या अफेअरच्या चर्चांनाही ऊत आला होता. त्याचवेळी त्याचे लग्न पूर्वीच झाले असल्याची चर्चाही जोरात होती.

  तेव्हा सनी देओलने ही बाब नाकारली होती. बऱ्याच वर्षांनंतर सनीच्या लग्नाची माहिती जनतेसमोर आली. तोपर्यंत ही बाब गुप्त ठेवण्यात आली होती. आजही सनी देओलची पत्नी पूजा देओल (Pooja Deol) प्रकाशझोतात नसते. ती कधीच फारशी माध्यमांसमोर आली नाही. हिरोईन्ससारखीच देखणी असलेली पूजा देओल आजही पार्ट्या आणि प्रसिद्धीपासून दूर राहते.

  पूजा देओल मुलगा करण (Karan) याच्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या प्रीमियरला हजर होती. धर्मेंद्र यांची मोठी सून असलेली पूजा ही सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही नायिकेपेक्षा कमी नाही. मात्र, तिला बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जाणे आवडत नाही. त्यामुळे तिच्याबद्दल कधी फारशी चर्चा झाली नाही की तिचे फोटोही झळकले नाहीत. स्वतः सनी देओल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तो अनेकदा त्याच्या कुटुंबासह फोटो शेअर करतो; पण तो पत्नी पूजासोबतचे फोटो कधीच शेअर करत नाही. सनी आपले वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवणेच पसंत करतो, यामुळेच पुजाबद्दलही तो फार चर्चा करत नाही. पूजानेही ग्लॅमर इंडस्ट्रीपासून स्वतःला नेहमी दूर ठेवलं असून, घरातील जबाबदाऱ्यांमध्ये ती व्यस्त असते.

  लंडनमध्ये शिकलेल्या पूजाची सनीसोबत पहिली भेटही लंडनमध्येच (London) झाली होती. त्यानंतर काही काळातच त्यांचे लग्न झाले. मात्र त्यावेळी सनी देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत होता, त्याचा पहिला चित्रपट बेताब प्रदर्शित व्हायचा होता, त्यामुळे धर्मेंद्र यांना चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या लग्नाची बाब सर्वांसमोर येणे नको होते. कारण याचा सनीच्या रोमँटिक प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळे ‘बेताब’ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत पूजा लंडनमध्ये राहिली. त्यावेळी सनी अनेकदा पूजाला भेटण्यासाठी गुप्तपणे लंडनला जात असे. त्यावेळी सनीच्या लग्नाची बातमी वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाली, तेव्हा सनी देओलने लग्न झाल्याचे नाकारले. इंग्लंडमधील (UK) एका मासिकाच्या कव्हर पेजवर सनी देओल आणि पूजाच्या लग्नाचा फोटो छापण्यात आला होता. ते मासिक जुलै 1984 मध्ये प्रकाशित झाले होते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा या जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला आहे. सोशल मीडियावर सनी देओलच्या कुटुंबाची चर्चा आहे.

  सध्या सनी देओल 2007 मधील ‘अपने’ या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असून, या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू होणार होते; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ते थांबवावे लागले. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले होते की, धर्मेंद्र यांचे वय लक्षात घेता, शूटिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सनी देओल लवकरच दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘गदर 2’ चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच सनी देओलने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले. यात अमिषा पटेलसह मुलगा जीतच्या भूमिकेत अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

  First published:

  Tags: Entertainment, Sunny deol