मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बंधनं तोडण्याची वेळ आलीये...'; लाऊडस्पीकर-हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया

'बंधनं तोडण्याची वेळ आलीये...'; लाऊडस्पीकर-हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया

सध्या लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वाद  (Loudspeaker and Hanuman Chalisa Row) देशभर चर्चेत आहे. यावरुनही बरेच राजकारण होत आहे. या विषयावर नेतेमंडळी सतत आपली मतं व्यक्त करत आहेत. आता लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर अभिनेता सोनू सूदने आपलं मत व्यक्त केलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 8 मे- सध्या लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वाद  (Loudspeaker and Hanuman Chalisa Row) देशभर चर्चेत आहे. यावरुनही बरेच राजकारण होत आहे. या विषयावर नेतेमंडळी सतत आपली मतं व्यक्त करत आहेत. आता लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर अभिनेता सोनू सूदने आपलं मत व्यक्त केलं आहे. देशात सुरू असलेल्या या वादामुळे आपल्याला प्रचंड दु:ख होत असल्याचं अभिनेत्याचं मत आहे. पुणे येथे झालेल्या JITO Connect 2022 समिट दरम्यान अभिनेत्याने या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आणि लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

सोनू सूदचे नाव अशा बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे जे देश-विदेशात सुरू असलेल्या समस्यांवर स्पष्टपणे आपले मत मांडतात. अलीकडेच त्यांनी देशात सुरू असलेल्या लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर आपली भूमिका मांडली आहे. लोकांनी धर्म आणि जातीची बंधने तोडण्याची वेळ आली आहे.असं स्पष्ट मत सोनूने मांडलं आहे.

सोनू सूदने या मुद्द्यावर बोलताना कोरोना काळाचा उल्लेख केला आहे. अभिनेत्याने म्हटलं की, 'लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर लोक जे विष पेरत आहेत ते पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर खूप वेदना होतात. गेल्या अडीच वर्षांपासून आपण एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढत आहोत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात जेव्हा लोक ऑक्सिजनसाठी धडपडत होते, तेव्हा धर्माची चिंता न करता लोकांनी एकमेकांना मदतीचा हात पुढे केला होता. कोरोना महामारीने सर्वांना एकत्र केले होते'.

सोनू सूदने पुढे बोलताना, राजकीय पक्षांना आवाहन केले की, सर्वांनी उत्कृष्ट देशासाठी एकत्र यावे. मानवतावादी आधारावर योगदान देण्यासाठी आपल्याला धर्म आणि जातीच्या सीमा ओलांडल्या पाहिजेत आणि धर्माच्या पलीकडे आपण एकत्र उभे राहिलो तर लाऊडस्पीकरचा वाद आपोआप संपेल. आणि समाजात फक्त माणुसकी आणि बंधुता पाहायला मिळेल असं मत सोनूने व्यक्त केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Sonu Sood