मुंबई, 21ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) नुकताच मुलगा आर्यन खानला**(Aryan Khan)** भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये पोहोचला आहे. नुकताच शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये शाहरुख जेलमध्ये जात असल्याचं दिसत आहे. क्रूज ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. कोर्टाने त्याचा जमीन काल पुन्हा फेटाळून लावला आहे.
आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात pic.twitter.com/N3BOb8pExk
— News18Lokmat (@News18lokmat) October 21, 2021
३ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर ७ जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. सध्या आर्यन खानच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र त्याला जामीन अजूनही मिळाला नाही. काळ झालेल्या सुनावणीमध्ये त्याचा जमीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. त्यांनतर आर्यन खानचा वकिलाने मुंबई हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. तसेच आर्यन खानसोबत त्याची मैत्रीण मॉडेल मुनमुन धमेजा आणि मित्र अरबाज मर्चंट यांचाही जामीन फेटाळून लावण्यात आला होता. यावर मुनमुनच्या वकिलांनी न्यूज १८ लोकमतशी संवाद साधत म्हटलं आहे, ‘आम्ही पूर्ण तयार आहोत. मंगळवारी सुनावणी सुरु होताच लवकरात लवकर आम्ही आमचे युक्तिवाद संपवू. दरम्यान मुनमुनचा भाऊ त्याच्या सतत संपर्कात आहे.तो तिला भेटण्यासाठीसुद्धा आला होता’. असं तिचे वकील असिफ अली यांनी म्हटलं आहे. आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. सोबतच आर्यन खानची आज न्यायालयीन कोठडी संपत असून.त्याला vc द्वारे मुंबई सेशन कोर्टात हजर केली जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे २ च्या सुमारास आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना पुढील सुनावणीसाठी हजर केलं जाणार आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या तिघांच्या जामिनावर सुनावणी ठेवल्याने या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच (NCB) ने विशेष न्यायालयात आर्यन खानच्या(Aryan Khan Drug Case) जामीन अर्जाला विरोध सुरूच ठेवला होता. NCB कडून सांगण्यात आलं कि, हाती लागलेल्या पुराव्यांनुसार बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा तीन वर्षांपासून ड्रग्सचा नियमित ग्राहक आहे. तसेच NCB ने पुढं म्हटलं, की त्याचा मित्र अरबाज मर्चंटला काँट्राबँडवर बंदी असल्याचे आढळले.हे दोघेही त्याचा वापर करत होते. त्यामुळे जामीन मंजूर केला जाऊ नये असं त्यांनी म्हटलंहोतं. कारण खान पुराव्यांशी छेडछाड करू शकतो आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, असं ”एनसीबीने न्यायालयात सांगितल होतं.