मुंबई, 30 ऑगस्ट: अभिनेता मिलिंद सोमन याची पत्नी अंकिता कोंवर हिचा आज वाढदिवस आहे. 2018 मध्ये या दोघांच्या लग्नानंतर (Milind Soman marriage) ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. लग्नाआधी हे दोघे कितीतरी वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांच्या वयामधील फरकामुळे (Milind Soman Ankita Konwar age gap) त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. अंकिता आज 30 (Ankita Konwar age) वर्षांची होईल. मिलिंद आणि अंकिताच्या वयात तब्बल 25 वर्षांचं अंतर आहे. अर्थात, या दोघांनी कधीही लोकांचं बोलणं मनावर घेतलं नाही. अंकिता वयाने लहान असली, तरीही कोणत्याही बाबतीत मिलिंदपेक्षा कमी नाही. तिच्या सोशल मीडियावरील (Ankita Konwar instagram) पोस्ट्समधून हे कायम दिसून येतं. हे दोघे कायम एकत्र धावण्यासाठी जातात, तसेच एकत्र वर्कआउटही करतात. मिलिंद प्रमाणेच अंकिताही फिटनेस फ्रीक आहे. 2015 च्या नोव्हेंबरमध्ये (Milind Soman love story) या दोघांनी 10 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली होती. यानंतरच त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. हे दोघेही फिटनेसच्या बाबतीत अगदीच एकसारखे आहेत. त्यामुळेच लग्नानंतरही त्यांचं फिटनेस लाईफ अगदी ॲक्टिव्ह आहे.
नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते हायवेच्या कडेने एकत्र धावत आहेत. अंकिता या व्हिडिओच्या (Ankita Konwar video) कॅप्शनमध्ये म्हणते, “हायवेवर धावण्याचा हा सातवा दिवस आहे. उद्या आम्ही स्टॅच्यूजवळ पोहोचू, हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. मात्र, त्याबाबत नंतर सांगेन. आता खूप थकले आहे.” अंकिता तिला आणि मिलिंदला ‘रनिंग कपल’ (Running Couple) म्हणते. अंकिता आणि मिलिंद कित्येक प्रकारच्या रनिंग कॅम्पेन आणि मॅराथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतात. 55 वर्षांचा मिलिंद हा आजही तरुणांना लाजवेल अशा प्रकारे धावतो, आणि अंकिताही त्याला तेवढ्याच जोमाने साथ देते. (हे वाचा: शाहरुखच्या ‘पठान’मध्ये सलमानसुद्धा झळकणार; VIDEO होतोय VIRAL ) अंकिताचं खरं नाव संकुश्मिता कोंवर (Ankita Konwar real name) असं आहे. तिचा जन्म गुवाहाटीमध्ये झाला. 2013मध्ये ती एअर एशिया कंपनीच्या विमानामध्ये केबिन क्रू एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. तिला हिंदी, बंगाली, आसामी, इंग्रजी आणि फ्रेंचसोबतच इतरही भाषा येतात. (हे वाचा: पठान’ ते ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटांसाठी कलाकारांना मिळालं आहे भरमसाठ मानधन ) धावण्याव्यतिरिक्त अंकिता इतर वर्कआऊटही (Ankita Konwar workout) करते. मिलिंदसोबत वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने दोघांचा सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यासोबतच ती हेवी वर्कआऊट सुद्धा करते. ती स्वतःला ‘आर्ट फ्रीक’ म्हणवते. तिलाही मिलिंदप्रमाणेच निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडतं. त्यामुळेच अंकिता आऊटडोअर वर्कआऊट करण्याला प्राधान्य देते. या दोघांनाही फिरण्याची आवड आहे. ते दोघे मिळून कित्येक ठिकाणी ट्रेकिंगलाही जातात.