बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असणारी पूनम पांडे आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. 2 महिन्यांपूर्वी तिने लग्न केलं होतं. आता ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या प्रेग्नन्सीच्या चर्चांबाबत पूनम पांडेने मौन सोडलं आहे.
1 सप्टेंबर 2020 रोजी पूनम पांडेचं लग्न झालं. तिच्या नवऱ्यासोबत ती अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होती. त्यानंतर दोघं गोव्याला हनीमूनलाही गेले होते. त्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आलं. एका डॉक्टरांनी पूनम पांडे गरोदर असल्याचा दावा केल्याचं बोललं जात होतं. पण पूनमने यावर काहीच उत्तर दिलं नव्हतं.
पूनम पांडे म्हणते, ‘मी गरोदर असल्याच्या चर्चेबाबत काही सत्य असेल तर मी स्वत: ते जगाला सांगीन’ पूनमने प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांना नीटसा होकार दिलेला नाही किंवा पूर्णपणे नकारही दिला नाही.
काही दिवसांपूर्वी गोव्यात एक अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला होता. पूनम पांडे आणि तिच्या नवऱ्याला सरकारी जागेवर अश्लील व्हिडीओ शूट करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.
कोर्टाने नुकतीच त्यांना मुंबईला येण्याची परवानगी दिली आहे. 13 नोव्हेंबर रोजी पूनम पांडे आणि तिचा नवरा मुंबईत परतले आहेत. या आधी पूनम पांडे आपला पती सॅम बॉम्बे याच्यासह गोव्यात हनिमूनसाठी आली असताना सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला अशी तक्रार गोवा पोलिसांत दिली होती.