Home /News /entertainment /

Aashram 3 Trailer: समोर येणार ढोंगी बाबाचं सत्य?बहुचर्चित वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Aashram 3 Trailer: समोर येणार ढोंगी बाबाचं सत्य?बहुचर्चित वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर 'आश्रम' (Aashram) ही वेबसीरिज प्रचंड चर्चेत आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तर दुसरीकडे या वेबसीरिजवर आक्षेपसुद्धा घेण्यात आले होते. त्यामुळे ही सीरिज चांगलीच वादात अडकली होती. आश्रमच्या दोन यशस्वी भागानंतर आता या वेबसीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. आज या वेबसीरिजचा पहिला टीजर रिलीज करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 मे- बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol)  स्टारर 'आश्रम' (Aashram) ही वेबसीरिज प्रचंड चर्चेत आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तर दुसरीकडे या वेबसीरिजवर आक्षेपसुद्धा घेण्यात आले होते. त्यामुळे ही सीरिज चांगलीच वादात अडकली होती. आश्रमच्या दोन यशस्वी भागानंतर आता या वेबसीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. आज या वेबसीरिजचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा आश्रममधील बाबासाठी भक्त जोरजोरात घोषणा देताना दिसत आहेत. या बाबाचं नाव आहे 'काशीपूरवाले बाबा निराला'. ही भूमिका अभिनेता बॉबी देओलने साकारली आहे. सोबतच एक तरुणी बाबाच्या हत्येचा कट रचताना दिसत आहे. परंतु हा कट अयशस्वी ठरतो हे या ट्रेलरमधून स्पष्ट होतं. या 1 मिनिटा 11 सेकंदच्या ट्रेलरमधून या सीजनमध्ये किती थरारक गोष्टी घडणार याचा अंदाज येत आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक फारच उत्सुक झाले आहेत. सीजन 3 पाहण्यासाठी प्रेक्षक मोठे उत्सुक झाले आहेत. येत्या ३ जूनला हि वेबसीरिज एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार आहे. तत्पूर्वीच या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढविली आहे. याआधी 'आश्रम'चे दोन्ही सीजन प्रचंड चर्चेत आले होते. प्रकाश झा यांच्या या वेबसीरिज बाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी या वेबसीरिजचं कौतुक केलं होतं. तर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपदेखील केला होता. याबाबत बॉबी देओल यांनी फेसबुकवर न्यूज 18 शी बोलताना म्हटलं होतं की, 'या वेब सीरिजमध्ये धर्माच्या नावाखाली फसवणूक करणा बाबांविरूद्ध भूमिका मांडली गेली आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. पण समाजात जे घडत आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला असंही त्यांने म्हटलं होतं.'
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bobby deol, Entertainment, Web series

    पुढील बातम्या