मुंबई, 8 डिसेंबर- मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कायम काही ना काही कारणामुळं चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स (Dressing sense) हाच बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो. इतरांसाठी ज्या ठिकाणी फॅशन (fashion ) संपते तिथून उर्फीच्या फॅशनला सुरुवात होते. काहीवेळा, तिचे फॅशनचे प्रयोग पूर्णपणे फसतात तर काहीवेळा ती लोकांना आपली स्तुती करण्यास भाग पाडते. ती कायम अतिशय बोल्ड कपड्यांची (Bold clothes) निवड करते. आपली ही निवड ती अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते. विशेष म्हणजे ती फक्त शूटसाठीच बोल्ड कपडे घालते असं नाही तर अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवरही दिमाखात फिरते. आता पुन्हा एकदा उर्फी आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे (Photoshoot) चर्चेत आली आहे. तिनं केवळ एक लांब कपड्याचा तुकडा (आपण त्याला ओढणी म्हणू शकतो) आपल्या शरीराभोवती गुंडाळून एक सुपर हॉट आणि सुपर रिस्की फोटोशूट केलं आहे. यावर लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इंडिया डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उर्फी जावेदनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमधील तिचा नवीन लूक पाहून तिचे चाहते एकदम खूश झाले आहेत. या फोटोंमध्ये उर्फीनं केशरी आणि लाल रंगाची ओढणी शरीराच्या वरच्या भागाला गुंडाळून आपला टोन्ड मिड्रिफ (toned midriff) दाखवला आहे. अतिशय हटके पद्धतीनं बॉडी फ्लॉंटिंगसाठी लोकप्रिय असलेल्या उर्फीनं आपल्या छातीवर ओढणीच्या सहाय्यानं एक कॉर्सेट (corset) तयार केलेला आहे. कंबरेच्या खाली तोच केशरी दुपट्टा सलवारच्या पद्धतीने घातला आहे.
उर्फी जेव्हा-जेव्हा नवीन अवतारात आपले फोटो पोस्ट करते तेव्हा इंटरनेटवर वेगवेगळ्या कमेंट्सचा पूर येतो. काहींना तिचा आत्मविश्वास आणि फॅशन सेन्सचं कौतुक वाटतं तर, काहीजण तिच्यावर टीका करतात. यावेळी देखील उर्फीनं जेव्हा आपले फोटो पोस्ट केले तेव्हा लोकांनी धडाधड कमेंट करण्यास सुरुवात केली. तू काय गळ्यात फक्त दोरी गुंडाळून डिझाईन तयार केलं आहेस का? अशी कमेंट एका युजर केली आहे. तर, एका युजरनं तिला बॉलिवुडची फिमेल रणवीर सिंग म्हटलं आहे. ती रणवीर सिंगप्रमाणेचं अल्ट्रा कूल स्टाईल कॅरी करते असं या युजरचं म्हणणं आहे.उर्फीच्या नवीन बोल्ड फोटोंवर लोकांनी मिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत आहे. तो पाहूनच अनेकांना तिचा हेवा वाटतो.