Home /News /entertainment /

हद्दच! उर्फी जावेदने घातला चक्क म्हातारीच्या केसांपासून बनवलेला ड्रेस, VIDEO समोर येताच झाली ट्रोल

हद्दच! उर्फी जावेदने घातला चक्क म्हातारीच्या केसांपासून बनवलेला ड्रेस, VIDEO समोर येताच झाली ट्रोल

'बिग बॉस OTT' (Bigg Boss OTT) मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed) होय.उर्फी जावेद (Urfi Javed) या शोमध्ये फक्त एक आठवडाच होती. शोमधून आऊट झाली होती. मात्र या शोनंतर ती सतत चर्चेत असते. उर्फी आपल्या अभिनयापेक्षा आपल्या लुकमुळे सतत चर्चेत असते. ती दररोज हटके पोशाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेत असते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 एप्रिल-   'बिग बॉस OTT' (Bigg Boss OTT) मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed) होय.उर्फी जावेद   (Urfi Javed)  या शोमध्ये फक्त एक आठवडाच होती. शोमधून आऊट झाली होती. मात्र या शोनंतर ती सतत चर्चेत असते. उर्फी आपल्या अभिनयापेक्षा आपल्या लुकमुळे सतत चर्चेत असते. ती दररोज हटके पोशाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेत असते.साखळीचा आणि सेफ्टी पिनच्या ड्रेसनंतर उर्फीने चक्क खायच्या एका गोष्टीपासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर आपल्या अतरंगी लुकमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे ट्रोलदेखील होत असते. परंतु या सर्वांचा उर्फीवर अजिबात परिणाम होत नाही. ती नेहमीच आपल्या अंदाजात वावरत असते.आजही असंच काहीसं झालं आहे. आज उर्फीला पाहून अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. अनेकांनी तिला कमेंट्स करत हद्द झाल्याचं म्हटलं आहे. या सर्व गोष्टी एका बाजूला पण तुम्हाला म्हातारीचे केस अर्थातच कॉटन कँडी माहिती आहे का? प्रत्येक व्यक्तीच्या बालपणीची ही एक गोड आठवण आहे.आजही अनेक लहान मुले आजही कॉटन कँडीचा आनंद घेत असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण उर्फी वरून थेट कॉटन कँडीवर उडी का घेतली. त्याचं कारणसुद्धा असंच आहे. कारण आज आम्ही उर्फीबद्दल जे सांगत आहोत त्यामध्ये कॉटन कँडी महत्वाचा विषय आहे. आज उर्फी जावेदने जो ड्रेस परिधान केला आहे. तो ड्रेस चक्क कॉटन कँडीपासून बनविण्यात आला आहे. उर्फी जावेदने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या कॉटन कँडीपासून बनलेला ड्रेस घातलेला आहे. इतकंच नव्हे तर ती या ड्रेसमधील कॉटन कँडी काढून खात देखील आहे.
    View this post on Instagram

    A post shared by Urrfii (@urf7i)

    उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, 'वेडी', तर दुसऱ्याने म्हटलं आहे, 'हि फॅशनमध्ये सगळ्यांनाच मागे टाकेल', तर आणखी एकाने म्हटलंय, 'डिझायनरचं नाव तर सांग दीदी'. तर उर्फीच्या चाहत्यांनी तिच्या या ड्रेसला 'युनिक', काही तरी वेगळं' असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg Boss OTT, Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या