जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'म्हणून बाबा माझा सकाळी उठल्या उठल्या चेहरा पाहतात', उत्कर्षनं फादर्स डेनिमित्त सांगितला आनंद शिंदेचा 'तो' किस्सा

'म्हणून बाबा माझा सकाळी उठल्या उठल्या चेहरा पाहतात', उत्कर्षनं फादर्स डेनिमित्त सांगितला आनंद शिंदेचा 'तो' किस्सा

, अभिनेता उत्कर्ष शिंदे याने देखील वडील आणि लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

, अभिनेता उत्कर्ष शिंदे याने देखील वडील आणि लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

फादर्स डेनिमित्त अनेकांनी आपल्या वडिलांसोबतचे काही सुंदर फोटो शेअर करत काही जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत, अभिनेता उत्कर्ष शिंदे याने देखील वडील आणि लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जून- आयुष्यात वडिलांचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. जिथे आई आपल्याला प्रेम आणि आपुलकी देते, तिथे वडील जीवनाचा भक्कम पाया घालतात. यामुळेच दरवर्षी जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डेनिमित्त अनेकांनी आपल्या वडिलांसोबतचे काही सुंदर फोटो शेअर करत काही जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत, अभिनेता उत्कर्ष शिंदे याने देखील वडील आणि लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आनंद शिंदे संगीताच्या विश्वातील मोठं नाव आहे. बिग बॉसच्या घऱात आपण सगळ्यांनी उत्कर्षला पाहिलं आहे. तो त्याचे वडिलांच्या किती क्लोज आहे, याचा सर्वांनी अनुभव घेतलाच आहे. आज फादर्स डेनिमित्त उत्करर्षनं असात एक किस्सा शेअर केला आहे. त्याने इन्स्टा पोस्टमध्ये एका वृत्तपत्रात्या बातमीचं एक कात्रन शेअर केलं आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘‘आई चे मोल कसे लावाल… बाबा चे त्याग कसे मोजाल कसा लावाल तुमही अंदाजा आई अहे स्वर्ग बाबा दरवाजा’’’ उत्कर्षनं शेअर केलेल्या या कात्रनामध्ये त्याने त्याच्या नावाच एक किस्सा सांगितला आहे. त्याने म्हटलं आहे की, माझं नाव माझ्या बाबांनी ठेवलं आहे. तसं पाहता आम्ही तिन्ही भावडं बाबांच्या खूप क्लोज आहे. पण माझा जन्म झाला तेव्हा बाबाचं नवीन पोपट हे गाणं रिलीज झालं होतं. बाबांच्या या गाण्यानं गिनीज बुक रेकॉर्ड केलं होतं. तेव्हापासून बाबा मला खूप लकी मानतात.सकाळ झाली की माझा चेहरा पहिला पाहतात.

News18लोकमत
News18लोकमत

तो पुढे म्हणतो की, शिवाय मी डाक्टर व्हावे ही बाबांनी सांगितलेल. बाबांचे एकच मत होत, तू संगीतकार आहे प्रेक्षक तुझ्यावर प्रेम करतात. तू डाक्टर बनून त्यांची सेवा कर.. कोणाचीही मदत न घेता स्वताचं नाव मोठं करा, आपलं काम प्रामाणिकपणे करा, प्रेक्षकांना तुम्हचं काम नक्की आवडेल. बाबांनी दिलेली ही शिकवण आजही माझ्या लक्षात आहे..असा एक किस्सा उत्कर्षनं यानिमित्त शेअर केला आहे.

जाहिरात

सध्या उत्कर्ष शिंदे त्याच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमामुळं चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमासाठी त्यानं खाल बॉडी बनवली आहे, अनेकदा तो फिटनेसचे व्हिडिओ देखील शेअर करताना दिसतात. उत्कर्षचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नेहमीच तो त्यांच्यासाठी वेळ काढताना दिसतो. डॉक्टर,. संगीतकार ते अभिनेता असा उत्कुर्षचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात