मुंबई, 6 एप्रिल- छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शोमध्ये अनेक सेलिब्रेटींना आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. यातीलच एक लोकप्रिय शो म्हणजे
बिग बॉस
होय. बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रेटी एकमेकांच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळाले आहेत. यातील काही कलाकारांनी लग्न करत संसार थाटलाय तर काहींनी बाहेर येताच आपले मार्ग वेगळे करत विभक्त झाले आहेत. आता या यादीत ‘बिग बॉस 13’ फेम
माहिरा शर्मा आणि पारस छाब्रा
यांचादेखील समावेश झाला आहे. या लोकप्रिय जोडप्याने ब्रेकअप करत सर्वांनाच धक्का दिला आहे. ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन तुफान लोकप्रिय ठरला होता. या शोमधून अनेक जोड्या चर्चेत आल्या होत्या. सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिल, असीम रियाज-हिमांशी खुराना आणि पारस छाब्रा-माहिरा शर्मा. या जोड्यांनी आपल्या हटके केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा हे जोडपे एकत्र होते. दरम्यान आता पारस आणि माहिराच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या दोघांनी आपलं नातं संपुष्ठात आणत ब्रेकअप केला आहे. या दोघांचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. (हे वाचा:
Bipasha Basu: किती गोड! बिपाशा बसूने अखेर दाखवला लेकीचा चेहरा; अशी दिसते देवी
) पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड पसंत पडायची. दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. पारस आणि माहिरा सतत एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत होते. या दोघांच्या जोडीला चाहते भरभरुन प्रेमही देत असत. मात्र या दोघांच्या विभक्त होण्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांनीही आपल्या सोशल मीडियावरुन एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. सोबतच या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप असं काही झालेलं नाहीय. हे दोघेही अजून एकमेकांना इंस्टावर फॉलो करत आहेत.त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही गेल्या काही महिन्यांपासून चंडीगढमध्ये राहात होते. नुकतंच काम संपवून ते मुंबईत परतले आहेत. पण मुंबईत येताच त्यांच्यामध्ये बिनसल्याचं म्हटलं जात आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही सांगितलं जात आहे की, पारस छाब्रा माहिरा शर्माच्या ओव्हर पझेसिव्हनेसने वैतागला होता. त्यामुळेच या दोघांमध्ये बिनसलं आणि दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्याप या दोघांनी आपल्या ब्रेकअपबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीय.