'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान होय. हिना खान नेहमीच मॉडर्न् लुकमध्ये दिसून येते.
मात्र हिना खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती सुंदर अशा पारंपरिक लुकमध्ये दिसून येत आहे.
आपल्या नवीन फोटोंमध्ये हिनाने लाल आणि काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. यामध्ये ती खूपच उठून दिसत आहे.
वेस्टर्न असो किंवा पारंपरिक प्रत्येक लुक हिनाला खुलून दिसतो. प्रत्येक लुकमध्ये ती चाहत्यांना घायाळ करत असते.
चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून दाद देत असतात. इन्स्टाग्रामवर हिनाचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.