'स्वरागिणी'फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या 'बिग बॉस १५'मध्ये आपलं मनोरंजन करत आहे. छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा म्हणून तेजस्वीकडे पहिलं जातं.
'स्वरागिणी' या कलर्स वाहिनीवरील मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री हेली शाह होती. या दोघीनी सावत्र बहिणींची भूमिका साकारली होती. ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.
त्यांनतर तेजस्वी प्रकाश रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या स्टंटवर आधारित रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये तिने आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांचं मन जिंकलं होतं. शिवाय प्रत्येक स्टंटमध्ये तिचं डेडिकेशन पाहून रोहित शेट्टीही तिच्यावर इंप्रेस झाले होते.
तेजस्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे. इन्स्टाग्रामवर तिचे ३. २ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
तेजस्वी आपल्या निरागस आणि विनोदी वृत्तीमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. ती अनेकवेळा नकळत असे प्रश्न विचारून जाते ज्यामुळे समोरचा तिच्या प्रेमातच पडतो.
सध्या तेजस्वी प्रकाश 'बिग बॉस १५'मध्ये धम्माल करत आहे. ती आपल्या याच विनोदी वृत्तीने पुन्हा एकदा सलमान खान आणि चाहत्यांचं मन जिंकत आहे.
तेजस्वी प्रकाश आपल्या रियल लाईफमध्ये अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.