'बिग बॉस 14'ची विजेती आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. नुकताच रुबिनाने याबद्दलची माहिती देत पोस्ट शेयर केली आहे,.
रुबिना दिलैक लवकरच 'अर्ध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच रुबिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर याचं पोस्टर शेयर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
रुबिना दिलैकसोबतचं या चित्रपटासाठी दिग्दर्शक पलाशने टीव्ही अभिनेता हितेन तेजवानीलासुद्धा साईन केलं आहे.
या दोघांसोबतचं या चित्रपटामध्ये राजपाल यादव सुद्धा झळकणार आहेत. या चित्रपटाच्या शुटींगला नुकताच सुरुवात झाली आहे.
या माहितीनंतर रुबिनाचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. तिच्या पोस्टवर कमेंट्स करून तिला शुभेच्छा देत आनंद व्यक्त करत आहेत.
रुबिनाने 'छोटी बहू' मालिकेतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. सध्या ती 'शक्ती: अस्तित्व के अहसास की' या मालिकेत काम करत आहे.