Home /News /entertainment /

सिद्धार्थ शुक्लाच्या Instagram अकाऊंटमध्ये मोठा बदल, पाहताच चाहत्यांच्या डोळ्यात आले अश्रू

सिद्धार्थ शुक्लाच्या Instagram अकाऊंटमध्ये मोठा बदल, पाहताच चाहत्यांच्या डोळ्यात आले अश्रू

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आजही चाहत्यांना सिद्धार्थच्या निधनावर विश्वास ठेवणं कठीण होतं.

    मुंबई, 4 मार्च-   अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे  (Sidharth Shukla)  चाहते आजही त्याची प्रचंड आठवण काढत असतात. सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या जुन्या पोस्ट शेअर करुन त्याला आपल्यामध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आज सर्वच चाहते भावुक झाले आहेत. कारणसुद्धा तसंच आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल चाहत्यांच्या लक्षात येताच त्यांनी अभिनेत्याच्या इन्स्टा अकाऊंटचे   (Instagram Account)  स्क्रीनशॉट काढून ट्विटरवर शेअर केले आहेत. पाहूया नेमकं काय घडलंय. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आजही चाहत्यांना सिद्धार्थच्या निधनावर विश्वास ठेवणं कठीण होतं. चाहते सतत त्याचे जुने व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. परंतु आता सिद्धार्थ शुक्लाच्या इन्स्टा अकाऊंटमध्ये मोठा बदल झाल्याचं चाहत्यांनी नोटीस केलं आहे. सिद्धार्थच्या इन्स्टा अकाऊंटला आता इन्स्टाग्रामवर आठवणीच्या रूपात दाखवलं जात आहे. जेव्हा हा बदल चाहत्यांच्या लक्षात आला तेव्हा ते भावुक झाले आहेत. सिद्धार्थ शुक्लाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे स्क्रीनशॉट काढून चाहते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करत आहेत. सिद्धार्थच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले आहे, 'सिद्धार्थ शुक्लाची आठवण करत.' अशी अकाऊंट्स एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या आयुष्याची आठवण ठेवण्याचे ठिकाण बनतात. यामुळे चाहते भावुक झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांची आठवण काढून कमेंट करायला सुरुवात केली. 'बिग बॉस 13' चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता आता आपल्यात नाही हे स्वीकारणे चाहत्यांसाठी किती कठीण आहे. चाहत्यांनी असंही म्हंटल आहे की, सिद्धार्थ आपल्यामध्ये शारीरिकरित्या उपस्थित नसला तरी तो नेहमीच त्यांच्या मनावर राज्य करेल'.सिद्धार्थ शुक्लाला जाऊन अनेक महिने उलटून गेले. परंतु सोशल मीडियावर असा एकही दिवस जात नाही जेव्हा चाहत्यांना त्याची आठवण येत नसेल '.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Sidharth shukla, Tv actor

    पुढील बातम्या