जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर..' मोरूच्या मावशीची आठवण सांगताना भरत जाधव भावुक

'देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर..' मोरूच्या मावशीची आठवण सांगताना भरत जाधव भावुक

'देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर..' मोरूच्या मावशीची आठवण सांगताना भरत जाधव भावुक

भरत जाधवने नुकतीच विजय चव्हाण यांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च- नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने (Bharat Jadhav) आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटवली आहे. आपल्या आयुष्याच्या या यशस्वी प्रवासात भरत नेहमीच आपल्या आई वडिलांना, मित्रांना आणि सहकलाकारांना यशाचे श्रेय देऊ पाहतात. मात्र आणखी एक असे अभिनेते आहेत ज्यांचे तो मनापासून धन्यवाद मानतो, ते म्हणजे विजय चव्हाण. विजय चव्हाण (   vijay chavan ) आणि भरत जाधव यांनी मुंबईचा डबेवाला, जत्रा, पछाडलेला अशा अनेक चित्रपट आणि नाटकातून एकत्रित काम केलं आहे. भरत जाधवने नुकतीच विजय चव्हाण यांच्या आठवणीत एक पोस्ट केली आहे. भरत जाधवने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की,आचार्य अत्रे लिखित सुपरहिट नाटक ‘मोरूची मावशी’ **( moruchi mavshi )**चा पहिला प्रयोग १ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. त्यावेळी त्यात मावशीची भूमिका साकारली होती बापूराव माने यांनी. काही वर्षानंतर हेच नाटक नव्या संचात करायचं ठरलं आणि मावशीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांना पण त्यांनी नाव सुचवलं ते विजय चव्हाण यांच. आणि विजू मामांनी त्या भूमिकेचं सोनं केलं. विजू मामा अक्षरशः जगले ती भूमिका. मावशी साकारावी तर ती विजू मामांनीच.

जाहिरात

त्यांच्यानंतर मावशी साकारायची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. मोरूची मावशी साठी जेंव्हा मला विचारणा करण्यात आली तेंव्हा पहिला फोन विजू मामांना केला होता, की मी करू का… ते म्हणाले तूच कर..!! आजही मोरूची मावशी चा जिथे कुठे प्रयोग असेल तिथे देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची ही तसबीर असते #मोरूचीमावशी #विजयचव्हाण #मोठीमाणसं..भरत जाधवच्या या पोस्टवर चाहते देखील भावुक झाले आहेत. कमेंट करत अनेकांनी विजय चव्हाण यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. शिवाय त्यांचा अभिनय, विनोदाचं टाईमिंग याचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात