मुंबई,21 मे- मराठी चित्रपटसृष्टीतील अफलातून अभिनेता म्हणून भरत जाधव यांची ओळख आहे. विनोदी भूमिकांपासून ते अनेक गंभीर धाटणीच्या भूमिका साकारत भरतने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केलं आहे. मालिका असो, चित्रपट असो किंवा नाटक तिन्ही क्षेत्रात भरत नेहमीच सर्रस ठरला आहे. भरत जाधव सध्या चित्रपटांमध्ये झळकत नसला तरी तो नियमितपणे आपल्या नाटकांचे प्रयोग करतच असतो. अशातच काल भरत जाधव आपल्या ‘तू तू मी मी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी रत्नागिरीला पोहोचला होता. यादरम्यान नाट्यगृहात असं काही घडलं की, अभिनेत्याने नाराजी व्यक्त करत आपण परत इथे कधीही येणार नसल्याचं प्रेक्षकांना सांगून टाकलं. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सिनेसृष्टीत आपलं स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेला अभिनेता म्हणून भरत जाधवकडे पाहिलं जातं. सुरुवातीला लहान मोठ्या भूमिका साकारत आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या भरतने पडद्यावरील एक काळ गाजवला आहे. अल्पवधीतच त्याला एक दमदार मुख्य अभिनेता अशी ओळख मिळाली होती. (हे वाचा: Sakhi-Suvrat Lovestory: ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सखी-सुव्रत कसे पडलेले एकमेकांच्या प्रेमात; सेटवर नव्हे अशी सुरु झालेली लव्हस्टोरी ) भरत जाधवला दमदार अभिनयासोबतच त्याच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखलं जातं. अभिनेता प्रत्येक विषयावर आपलं शीफ़्ट असतो. भरत नेहमीच आपल्याला आलेले अनुभव, घडलेल्या घटना सोशल मीडियावरुन बिनधास्तपणे शेअर करत असतो. आजही अभिनेत्याने असंच काहीसं केलं आहे. आज भरतने थेट आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रत्नागिरीत नाटकादरम्यान संतापला भरत जाधव, नाट्यगृहात नेमकं काय घडलं? #bharatjadhav #marathiactor #news18lokmat pic.twitter.com/O9LilgI4jF
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2023
काल भरत जाधव रत्नागिरी याठिकाणी आपल्या ‘तू तू मी मी’ या तुफान गाजत असलेल्या नाटकाच्या प्रयोगासाठी पोहोचला होता. नाटक सुरु असतानाच अभिनेत्याला नाट्यगृहाची झालेली दुरावस्था पाहावली नाही. नाट्यगृहात साउंड सिस्टीममध्ये सतत बिघाड होत होते. तसेच नाट्यगृहातील एसीमध्यसुद्धा बिघाड झाला होता. या सर्व प्रकाराला वैतागून भरत जाधव यांनी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमीरच आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी भरत जाधव यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत म्हटलं, इथे काम करतांना आम्हालाही या सर्व प्रकारांचा त्रास होत आहे. तुम्हालाही एसीमुळे काय त्रास होत असेल आम्ही समजू शकतो. दरम्यान एससी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा भरत जाधवांची प्रेक्षकांना कळकळीची विनंती. प्रेक्षक इतके शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत भरत जाधव यांनी जाहीर करुन टाकलं.