मुंबई, 31 मार्च- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्यातीलच एक कलाकार म्हणजे निखिल बने होय. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. यामुळे तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. त्याचा आज एक वेगळा चाहता वर्ग आहे. अगदी सामान्य कुटुंबातील हा मुलगा आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.निखिल बनेच्या घरी नुकतीच अचानक पोलिसांची एंट्री झाली. यामुळे त्यांच्या घरातल्यांची आणि त्याची अशी काही अवस्था झाली आहे. नेमके त्याच्या घरी पोलीस कशासाठी आले होते असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
निखिल बने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे फोटो तसेच त्याच्या कामाबद्दलच्या अपडेट तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच त्याचे घरी पोलीस आले होते. पोलिसांसोबतचा निखिल बनेचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा-'आम्हाला दुसरी उर्फी नकोय', सई ताम्हणकरच्या नव्या लुकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पोलिसांसोबतचा फोटो शेअर करत निखिल बने म्हणतो की, आज भांडुप पोलीस स्टेशनचे सिनियर पोलिस इन्स्पेक्टर (PI) श्री. नितीन उनवणे साहेब यांनी राहत्या घरी भेट दिली. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण.आमच्या "महाराष्ट्राची हास्यजत्रा" या कार्यक्रमाचे खूप मोठे चाहते.❤️❤️
View this post on Instagram
निखिल आज लोकप्रिय कलाकार झाला असला तरीही तो भांडूपच्या चाळीत राहतो. यापूर्वी निखिलनं त्याच्या भांडूपमधील घराचे फोटो सर्वांसोबत शेअर देखील केले आहेत. निखिलच्या याच चाळीतल्या घरी त्याला भेटायला भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन उनवणे गेले होते.पोलीस अधिकारी नितीन हे स्वत: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे खूप मोठे फॅन आहेत. नितीन यांनी त्यांच्या विभागाचं नाव मोठं करणारा निखिल बनेची त्याच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्याचे आई बाबा सुद्धा सोबत होते. घरचे सगळे यावेळी आनंदात दिसले.
निखिलचं मुळ गाव चिपळूण आहे. मध्यंतरी निखिल त्याच्या शिमगोत्सवाच्या व्हिडिओमुळे चांगलाच चर्चेत आला होता. यावेळी तो कामामधून ब्रेक घेत पालखीसाठी गावी गेला होता. त्याने यावेळी पालखी नाचवताना दिसला. तसेच कोकणातील शिमगा नेमका कसा असतो याबाबत त्याने माहिती दिली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.