बिग बॉसमधून नावारुपास आलेली अभिनेत्री बेनाफ्शा सूनावाला मालिकांसोबतच वैयक्तिक अयुष्यामुळं देखील चर्चेत असते. सध्या ती अभिनेता प्रियांक शर्मासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळं चर्चेत आहे.
प्रियांक आणि बेनाफ्शा यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. गायिका आस्था गिलमुळं दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असंही म्हटलं जात आहे.
मात्र या चर्चेवर आता स्वत: बेनाफ्शानं स्पष्टीकरण दिलं. तिचं ब्रेकअप झालेलं नाही असं तिनं सांगितलं. “माझ्यावर लाईन मारु नका मी प्रियांकसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.” असा गंमतीशीर टोला देखील तिनं ट्रोलर्सला लगावला.
आर जे सिद्धार्थला दिलेल्या मुलाखतीत बेनाफ्शानं आपल्या प्रियांकसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, “रुसवे फुगवे तर प्रत्येक नात्यात असतात. परंतु यामुळं ते नातं तुटत नाही. तर ते आणखी घट्ट होतं.”
पुढे ती म्हणाली, “उगाचच आमच्याबद्दल अफवा पसरवू नका. कारण तुमच्या या अफवांच्या आमच्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही.”
बेनाफ्शा आणि प्रियांक यांची बिग बॉसच्या 11 सीझनमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली अन् पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.