मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bageshwar Dham: आता उलगडणार चमत्कारिक रहस्ये; 'बागेश्वर धाम'वर बनणार सिनेमा,पाडव्याला मोठी घोषणा

Bageshwar Dham: आता उलगडणार चमत्कारिक रहस्ये; 'बागेश्वर धाम'वर बनणार सिनेमा,पाडव्याला मोठी घोषणा

अभय प्रताप सिंग

अभय प्रताप सिंग

Movie On Bhageshwar Dham: सध्या बागेश्वर धाम हे नाव प्रचंड चर्चेत आहे. बागेश्वर धाममधील दैवी आणि चमत्कारिक शक्तींनी प्रत्येकजण थक्क होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 22 मार्च- सध्या बागेश्वर धाम हे नाव प्रचंड चर्चेत आहे. बागेश्वर धाममधील दैवी आणि चमत्कारिक शक्तींनी प्रत्येकजण थक्क होत आहे. हिंदू धर्माला सनातन धर्म म्हणून योग्य स्थान देण्यासाठी बागेश्वर धामच्या अथक प्रयत्नांचीही बरीच चर्चा होत आहे. या तीर्थक्षेत्रावर लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे तीर्थस्थान सतत चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा हे तीर्थस्थान चर्चेत आलं आहे. मात्र यंदा कारणही तसंच आहे. चित्रपट दिग्दर्शक अभय प्रताप सिंगने या तीर्थक्षेत्रावर आपण सिनेमा बनवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

अभय प्रताप सिंग यांनी बागेश्वर धाम या तीर्थ क्षेत्रावर सिनेमा बनवणार असल्याची घोषणा करताच पुन्हा एकदा या नावाची चर्चा सुरु झाली आहे. अभय प्रताप सिंग यांनी बागेश्वर धामच्या धार्मिक महत्वावर आधारित सिनेमा तयार करुन. त्या ठिकाणाचं धार्मिक, मानवतावादी आणि सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलं आहे.

(हे वाचा: Vandana Gupte: मराठमोळ्या वंदना गुप्तेंनी 70 व्या वर्षी पुन्हा बांधली लग्नगाठ; समोर आले फोटो)

दिग्दर्शक अभय प्रताप सिंग यांनी या सिनेमाच्या नावाबाबतही खुलासा केला आहे. या चित्रपटाचं नाव 'बागेश्वर धाम' असंच ठेवलं जाणार असल्याचं समोर आलं आहे. या नावासाठी अधिकृत नोंदणीसुद्धा करण्यात आली आहे. तसेच या वर्षाच्या दसऱ्यापर्यंत हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न असणार आहे. पुढच्या महिन्यात या सिनेमाच्या शुटिंगलाही सुरुवात होणार आहे.

आता सिनेमाची घोषणा झाल्यांनतर या सिनेमात कोणते कलाकार झळकणार? बॉलिवूडमधील कोणते कलाकार असणार? अशी विचारणा केली जात आहे. मात्र याबाबत अभय प्रताप सिंग यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या त्यांनी याबाबत बोलण्याचं टाळलं आहे.

याबाबत माहिती देताना त्यांनी फक्त इतकं सांगितलं की, बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत विविध भूमिकांसाठी चर्चा सुरु आहे. बोलणी पूर्ण होताच नावे उघड केली जातील. पुढच्या महिन्यात सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या विविध ठिकणांवर केलं जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bageshwar Dham, Bollywood, Entertainment