जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सलमान खान ड्रग्स घेतो, तर आमिर...; बाबा रामदेव यांनी बॉलिवूडवर साधला निशाणा

'सलमान खान ड्रग्स घेतो, तर आमिर...; बाबा रामदेव यांनी बॉलिवूडवर साधला निशाणा

फोटो

फोटो

नुकतंच बाबा रामदेव यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आमिर खानबाबत एक वक्तव्य करत खळबळ माजवली आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑक्टोबर-   योगगुरु अशी ओळख असणारे बाबा रामदेव नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. ते नेहमीच आपल्या वक्तव्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. बऱ्याचवेळा ते आपल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकतात. नुकतंच बाबा रामदेव यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आमिर खानबाबत एक वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. त्यांचं हे वक्तव्य आता जोरदार व्हायरल होत आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. नुकतंच मुरादाबाद याठिकाणी पार पडलेल्या नशामुक्त भारत अभियानात बाबा रामदेव यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवला. तर दुसरीकडे त्यांनी बॉलिवूड कलाकारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. बॉलिवूड भाईजान सलमान खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांचा उल्लेख करत काही वक्तव्ये केली आहेत. त्यांनी बॉलिवूडवर ड्रग्स घेत असल्याचा आरोप केला आहे. सध्या ही वक्तव्ये जोरदार चर्चेत आली आहेत. (हे वाचा: Salman khan : आता ईदबरोबर दिवाळीलाही सलमान भाईकडून मोठं सरप्राईज; पुढील वर्ष असेल खास **)** बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमादरम्यान लोकांशी संवाद साधला. तसेच त्यांना व्यसनमुक्त आयुष्याचं आवाहनदेखील केलं. यावेळी त्यांनी लोकांना विडी, सिगारेट, तंबाखू, दारू इत्यादी गोष्टींचं सेवन न करण्याचं आवाहन केलं. बाबा रामदेव यांनी संवाद साधत काही गोष्टी उघड केल्या. यामध्ये आर्यसमाजाने जे काम केलं आहे त्याची इथे आता आवश्यकता असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देश व्यसनमुक्त झाल्यास स्वामी दयानंद यांचं स्वप्न पूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु हे सर्व फक्त शासनाकडू होणार नाही तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतः प्रयत्न करावा लागेल असा सल्ला त्यांनी दिला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बॉलिवूडवर साधला निशाणा- बाबा रामदेव यांनी यावेळी बॉलिवूडवरसुद्धा हल्लाबोल केला. सेलेब्रेटींवर निशाणा साधत त्यांनी म्हटलं, शाहरुख खानचा मुलगा नुकतंच ड्रग्स घेत असल्याच्या कारणामुळे तुरुंगात जाऊन आला. तर सलमान खानसुद्धा ड्रग्स घेतो. आमिर खानचं काही माहिती नाही. कित्येक मोठमोठे कलाकार ड्रग्स घेतात. बॉलिवूडमध्ये सर्वत्र ड्रग्स घेणारे आहेत. बॉलिवूडमध्ये ड्रग्स, राजकारणामध्ये ड्रग्स, मतदानाला तर दारु वाटप केली जाते. ऋषी मुनींच्या या पवित्र भूमीला सर्वांनी व्यसनमुक्त करुन पुन्हा पवित्र केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात