रुपेरी पडद्यावर आयुष्मान खुरानाचा अभिनय खूपच पसंत केला जातो. ऑफबीट चित्रपटांमधील अभिनयामुळे या अभिनेत्याचे चाहतेही खूप आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारापासून ते फिल्मफेअर पुरस्कारापर्यंत सन्मानित आयुष्मान केवळ चांगले चित्रपटच करत नाही तर आलिशान जीवनशैली जगतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्षाला सुमारे 6 ते 7 कोटी कमावणारा अभिनेता सध्या त्याचा आगामी चित्रपट 'चंडीगढ़ करे आशिकी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.यादरम्यान अभिनेऱ्याने नुकताच एक फोटोशूट केलं आहे ज्यामुळे तो चर्चेत आहे.
आयुष्मान खुराना एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सुपर स्टायलिश गोल्ड आणि व्हाइट बॉम्बर जॅकेट घातलेला दिसला. पांढऱ्या पँटसह डिस्को स्टाइल जॅकेट आणि पांढऱ्या फुल टी-शर्टमध्ये अभिनेत्याच्या लूकची प्रशंसा केली जात आहे.
आयुष्मान खुरानाने परिधान केलेले स्टायलिश जॅकेट हे सामान्य जॅकेट नसून अतिशय खास आहे. हे जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
आयुष्मान खुरानाचे हे गोल्ड-व्हाइट जॅकेट डिझायनर गौरव गुप्ताने डिझाइन केले आहे. गौरवने यासाठी वापरलेले साहित्य अतिशय खास आहे.
आयुष्मान खुरानाचे हे जॅकेट इको-फ्रेंडली आहे. ते इकोकारीने तयार केले आहे. व्हाइट आणि गोल्ड ग्लायडेड बॉम्बर जॅकेट कचऱ्यापासून बवण्यात आलं आहे.
आयुष्मान खुरानाच्या या जॅकेटचे फॅब्रिक बिस्कीट रॅपर्स, समुद्रातून काढलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या अशा दैनंदिन वस्तूंचा पुनर्वापर करून तयार केले आहे.
सागरी कचऱ्यासोबत बायोडिग्रेडेबल उत्पादनांचा वापर करून हे सुंदर जॅकेट तयार करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत 60 हजार सांगितली जात आहे.