Home /News /entertainment /

आयुष्यमान खुराना होणार डॉक्टर! म्हणाला, 'ओपनिंग सून फॉर कन्सल्टेशन'

आयुष्यमान खुराना होणार डॉक्टर! म्हणाला, 'ओपनिंग सून फॉर कन्सल्टेशन'

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushman Khurana) तुमच्या हास्याचा डॉक्टर होणार आहे. जंगली पिक्चर्ससोबत (Junglee Pictures) तो नवीन चित्रपट करतो आहे.

  मुंबई, 22 डिसेंबर: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) ‘डॉक्टर जी’ (Doctor G) या विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच त्यानं या चित्रपटाबद्दल इन्स्टाग्रामवर माहिती दिली. या चित्रपटाचे स्क्रिप्ट हातात धरलेला त्याचा फोटो त्यानं शेअर केला असून, ‘ओपनिंग सून फॉर कन्सल्टेशन # डॉक्टरजी’ असं कॅप्शन दिलं आहे. अनुभूती कश्यप (Anubhuty Kashyap) या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाबद्दल माहिती देताना आयुष्मान म्हणाला, ‘या चित्रपटाचं स्क्रिप्ट वाचताक्षणी मी त्याच्या प्रेमात पडलो. अगदी ताजं करकरीत स्क्रिप्ट आहे. एक वेगळीच कल्पना आहे, जी प्रेक्षकांना मनमुराद हसवेल. मी या भूमिकेच्या निमित्तानं प्रथमच डॉक्टरचा कोट अंगावर चढवणार आहे. हा चित्रपट नुसतंच मनोरंजन करणारा नाही, तर यातून हृदयाला भिडणारा संदेशही देण्यात आला आहे.’
  चित्रपटाची दिग्दर्शक अनुभूती कश्यप हिचा हा पहिलाच चित्रपट असून ती या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ती म्हणाली, ‘मी अतिशय उत्सुक आहे माझा पहिला चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी. अतिशय गुणी अभिनेता असलेल्या आयुष्मान खुरानासोबत काम करण्यासाठीही मी उत्सुक आहे. जंगली पिक्चर्ससोबत माझा प्रवास यापुढेही सुरू राहील, असं मला वाटतं. युवा पिढीसह कुटुंबानं एकत्रित बसून बघण्यासारखा हा चित्रपट आहे.’ अनुभूती कश्यपनं याआधी अफसोस (Afsos) ही मिनी सिरीज आणि मोई मरजानी (Moi Marjani) ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे. डॉक्टर जी चित्रपटाचं लेखन सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत यांनी केलं आहे. सुमित सक्सेना यांनी या चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. सौरभ भारत हा स्वतः डॉक्टर असून त्यानं मेडिकल कॉलेजमधील जीवनाचे अनुभव यात मांडले आहेत. सुमित सक्सेना यांनी या आधी प्यार का पंचनामा (Pyaar Ka Punchnama) या चित्रपटाचं आणि करण जोहरच्या (karan Johar) लस्ट स्टोरीजमधील (Lust Stories) काही भागांचंही लेखन केलं आहे. जंगली पिक्चर्ससोबत (Junglee Pictures) आयुष्मानचा हा तिसरा चित्रपट असून, या आधी बरेली की बर्फी (Barely  Ki Burfi) आणि बधाई हो (Badhai Ho) हे चित्रपट त्यानं केले आहेत. आयुष्मानच्या कसदार अभिनयाची चुणूक या जंगली पिक्चर्सच्या तिसऱ्या चित्रपटात बघता येईल, असा विश्वास जंगली पिक्चर्सच्या सीईओ अम्रिता पांडे यांनी व्यक्त केला आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Ayushmann Khurrana, Bollywood

  पुढील बातम्या