मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आयुष्मान खुरानानं खरेदी केलं मुंबईत पहिलं घर! किंमत वाचून व्हाल थक्क

आयुष्मान खुरानानं खरेदी केलं मुंबईत पहिलं घर! किंमत वाचून व्हाल थक्क

आयुष्माननं मुंबईमध्ये आपलं हक्काचं पहिलं घर   (New Home)  खरेदी केलं आहे.

आयुष्माननं मुंबईमध्ये आपलं हक्काचं पहिलं घर (New Home) खरेदी केलं आहे.

आयुष्माननं मुंबईमध्ये आपलं हक्काचं पहिलं घर (New Home) खरेदी केलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 जानेवारी-   अभिनेता आयुष्मान खुराना   (Ayushmann Khurana)   आज बॉलिवूडमधील   (Bollywood)  टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. आयुष्माननं विविध धाटणीच्या भूमिका साकारत मनोरंजन सृष्टीत आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. त्याने अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. त्याच्या हटके चित्रपटांचे अनेक चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांना नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल कुतूहल असतं. आज आपल्या खाजगी आयुष्यात अभिनेता फारच आनंदी आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण आयुष्माननं मुंबईमध्ये आपलं हक्काचं पहिलं घर   (New Home)  खरेदी केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,आयुष्मान खुरानानं नुकतंच मुंबईमध्ये आपलं स्वतःचं घर खरेदी केलं आहे. अभिनेत्याचं घर फारच आलिशान आहे. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल चार गाड्यांची पार्किंग व्यवस्था आहे. या आलिशान घरची किंमत तब्बल 19 कोटी इतकी आहे. मनी कंन्ट्रोलनं याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. त्यांच्या मते, आयुष्मान लवकरच आपल्या कुटुंबासोबत नव्या घरी शिफ्ट होणार आहे.

या रिपोर्टनुसार, आयुष्मान खुरानाचं हे आलिशान घर 4 हजार 27 स्क्वेअर फूटांचं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2021 मध्ये आयुष्माननं या घराचं रजिस्ट्रेशन केलं होतं. यासाठी अभिनेत्यानं तब्बल 96  लाख 50 हजार रुपये भरले आहेत. आयुष्मानचं नवं घर पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. आयुष्मान नेहमीच आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसून येतो. त्याचं आपल्या कुटुंबाशी फार सुंदर बॉन्डिंग आहे. तो आपल्या कुटुंबासोबत या घरात राहणार आहे.

गावीसुद्धा खरेदी केलं घर-

अभिनेता आयुष्मान खुराना आपल्या मूळ गावाशी फारच जवळ आहे. तो कामानिमित्त मुंबईमध्ये राहत असला तरी, त्याचं आपल्या गावावर प्रचंड प्रेम आहे. हे त्यानं अनेक मुलाखतींदरम्यान सांगितलं आहे. त्यामुळेच त्यानं काही दिवसांपूर्वी आपलं मूळ गाव असणाऱ्या पंचकुलामध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. आपल्या कुटुंबाने एकत्र राहावं हे यामागचं उद्दिष्ट आहे. अभिनेत्याने याबद्दल बोलताना म्हटलं होतं, 'हा फक्त माझा नव्हे तर सर्व खुरानाजचा निर्णय आहे. सर्वांनी एकत्र यावं, राहावं सोबत वेळ घालवावा या विचाराने आम्ही हे घर खरेदी केलं आहे'. गावी असणाऱ्या या घराची किंमत ९ कोटी इतकी आहे.

First published:

Tags: Ayushmann Khurrana, Bollywood, Entertainment