चक्क एवेंजर्सचा आर्यन मॅनने केली अक्षय कुमारची कॉपी, खिलाडीने शेअर केला फोटो

चक्क एवेंजर्सचा आर्यन मॅनने केली अक्षय कुमारची कॉपी, खिलाडीने शेअर केला फोटो

आता अक्षय कुमारने त्याच आणि एवेंजर्स सिनेमातील आर्यन मॅनचं एक वेगळंच कनेक्शन सगळ्यांसमोर आणलं आहे.

  • Share this:

मुंबई, २८ एप्रिल- एवेंजर्स- एंडगेमची क्रेझ सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सारेच एवेंजर्सचे वेडे आहेत. हा सिनेमा जगभरात बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई करत आहे. भारतातले बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड या सिनेमाने मोडून काढले आहेत. आता अक्षय कुमारने त्याच आणि एवेंजर्स सिनेमातील आर्यन मॅनचं एक वेगळंच कनेक्शन सगळ्यांसमोर आणलं आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याने म्हटलं की, एवेंजर्स एंडगेममध्ये आर्यन मॅनची व्यक्तिरेखा साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनीनेही त्याच्यासारखीच टाय घातली आहे.

Photos- बॉलिवूडच्या लव्हबर्ड्सनेही पाहिला ‘एवेंजर्स एंडगेम’

रॉबर्ट डाउनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला. यात तो सूट आणि टाय घालून उभा असलेला दिसत आहे. अक्षयने जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा त्याला कळलं की त्याच्याकडेही अगदी तशीच टाय आहे. मग काय त्यानेही आपल्या फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
 

View this post on Instagram
 

When #IronMan Wears the same Tie as you!! #WhoWoreItBetter Ps: #EndGame is out of this World #Givenchy Tie @robertdowneyjr


A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

कर्करोगामुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था

या फोटोला कॅप्शन देताना अक्षयने लिहिले की, ‘जेव्हा आर्यन मॅनही तुमच्यासारखी टाय घालतात. कोणावर ही टाय चांगली दिसते?’ अक्षयच्या या पोस्टवर युझरने एकामागोमाग एक कमेन्ट द्यायला सुरुवात केली. एकाने तर चक्क लिहिले की, ‘पॅडमॅन आणि आर्यन मॅन एकत्र...’ अवघ्या १२ तासात या फोटोला १० लाखांहून जास्त लाइक्स आणि शेअर मिळाले आहेत.
यूपीच्या या सेलिब्रिटींचीच चालते बॉलिवूडवर सत्ता

म्हणून चर्चेत आहे अक्षय कुमार-

अक्षय कुमार सध्या त्याच्या सिनेमांमुळे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने मोदींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत अनेक अराजकीय प्रश्नांवर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अक्षयच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो करिना कपूरसोबत गुड न्यूज सिनेमात दिसणार आहे. २००९ मध्ये कमबख्त इश्कमध्ये दोघांनी एकत्र शेवटचं काम केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2019 02:13 PM IST

ताज्या बातम्या