मुंबई, 16 एप्रिल- गँगस्टर आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर आता विविध प्रतिकिया समोर येत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेसुद्धा एक ट्विट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. स्वरा भास्कर सतत विविध ज्वलंत विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसून येते. त्यामुळे तिला अनेकवेळा टीकेला सामोरं जावं लागतं. दरम्यान आता स्वरा भास्करने देशात सध्या चर्चेत असलेल्या गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्या प्रकरणावर ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. (हे वाचा: Femina Miss India 2023: अवघ्या19 वर्षांची नंदिनी गुप्ता बनली ‘मिस इंडिया’; आहे तरी कोण ही सुंदरी? ) स्वरा भास्कर ट्विट- स्वरा भास्करने ट्विटरवर ट्विट करत लिहलंय, ‘अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही आनंद साजरी करण्यासारखी गोष्ट नाही. हे राज्याच्या अराजकतेची स्थिती दर्शवते. हे सूचित करते की राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करत आहेत. हा भक्कम कारभार नाही. ही अराजकता आहे’.
An extra judicial killing or an encounter is not something to be celebrated. It signals a state of lawlessness. It signals that the State agencies have depleted credibility because they are acting like or enabling criminals. This is not strong governance, this is anarchy.
— Swara Bhasker (@ReallySwara) April 15, 2023
या ट्विटनंतर सोशल मीडियावर एक नवा वाद सुरु झाला आहे. स्वरा भास्करला अनेकांनी ट्विटवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी तो रावणासारखा होता आणि रावण दहनाचा आपण आनंद साजरा करतो त्यामुळे याचासुद्धा आनंद साजरा करण्यात काही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी आता गुन्हेगारांच्या हत्येवर तू शोक व्यक्त करणार का असा सवाल उपस्थित केला आहे.
माफिया अतिक अहमदबाबत सांगायचं तर, त्याच्यावर 1979 मध्ये खुनाच्या आरोपाखाली पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 1989 रोजी अतिकवर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माफिया चांद बाबाची हत्या केल्याचा आरोप होता. 1996 मध्ये प्रयागराज येथील व्यापारी अशोक साहू यांची हत्या केल्याचा आरोपही अतिकवर होता, ज्याने त्याचा भाऊ अशरफच्या गाडीला ओव्हरटेक केला होता.