मुंबई, 21 नोव्हेंबर: संपूर्ण भारतात गेल्या अनेक वर्षांपासून आवडीने पाहिली जाणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). या मालिकेनं गेल्या एक तपापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण तारक मेहताच्या प्रेक्षकांसाठी एक दु:खद बातमी आहे. या लोकप्रिय मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी (Asit kumarr Modi) यांना कोरोनाची (Corona)ची बाधा झाली आहे. खुद्द निर्मात्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे मालिकेच्या सेटवर गंभीर वातावरण आहे. जर त्यांच्या संपर्कात मालिकेतलेच काही लोक आले असतील तर त्यांनाही आयसोलेट करावं लागण्याची शक्यता आहे. असित कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट केलं, ‘जेव्हा मला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली तेव्हा मी टेस्ट करुन घेतली. टेस्टमध्ये मी पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारंटाइन करावं आणि सगळे प्रोटोकॉल पाळावे. माझी चिंता करू नका. तुमचं प्रेम आणि देवाचं आशीर्वाद यामुळे लवकरात लवकर बरा होईन.’
After some symptoms of COVID19,I got myself tested & Report came positive.I have isolated myself.I request🙏🏻who has come in my contact to be careful and follow the protocol.😊आप मेरी चिंता ना करें,आप के प्यार❤️प्रार्थना🙏🏻आशीर्वाद से मैं जल्दी ठीक हो जाऊँगा.आप😀मस्त 💪स्वस्थ रहें
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) November 20, 2020
लॉकडाऊननंतर जेव्हा ही मालिका पुन्हा सुरू झाली तेव्हापासून या मालिकेत बऱ्याच अडचणी येत आहेत. गुरूचरण आणि नेहा यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची जान असणारी अभिनेत्री दिसा वकानी म्हणजेच दयाबेन बऱ्याच काळापासून मालिकेपासून लांब आहे. मालिकेचं शूटिंग सध्या सुरू आहे पण जुन्या कलाकारांच्या जाण्यामुळे सेटवर उत्साह कमी आहे. दरम्यान असितकुमार मोदी यांच्या ट्वीटनंतर लोकांनी त्यांना लवकर बरे व्हा अशा आशयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. असितकुमार लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

)







