चुकीचं वागणाऱ्यांना स्वातंत्र्य नाही, तनुश्री-नाना प्रकरणात आशा भोसलेंची उडी

चुकीचं वागणाऱ्यांना स्वातंत्र्य नाही, तनुश्री-नाना प्रकरणात आशा भोसलेंची उडी

आशा भोसले म्हणाल्या, महिलांना आपलं दु:ख जगासमोर ठेवायला हवं.

  • Share this:

शिखा धारिवाल, मुंबई, 01 आॅक्टोबर : नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यातल्या काँट्रोव्हर्सीनंतर बाॅलिवूडचे मोठे चेहरे समोर आलेत. कंगना राणावत, रवीना टंडन, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा ही मंडळी तनुश्री दत्ताच्या बाजूनं उभे राहिलेत. पण अामिर खान, अमिताभ बच्चन, सलमान खान यांना मीडियानं याबद्दल विचारलं असता त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही.

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनाही याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मला या प्रकरणाबद्दल नक्की माहीत नाही. मी रेडिओ, टीव्ही जास्त बघत नाही. पण महिलांना कुणी त्रास दिला असेल तर त्यांनी याबद्दल मोकळेपणानं बोलावं. म्हणजे चुकीचं वागणाऱ्यांना स्वातंत्र्य नाही मिळणार.'

आशाताई म्हणाल्या, ' अनेकांना वाटतं स्त्रियांनी फक्त स्वयंपाक करावा किंवा मुलं जन्माला घालावीत. स्त्रीवर अनेक शतकं अत्याचार होतायत. या मानसिकतेला धुडकावून महिला पुढे जातायत. मी पण अशीच पुढे आलीय.'

आशा भोसले म्हणाल्या, महिलांना आपलं दु:ख जगासमोर ठेवायला हवं. तुमच्यासोबत जे घडलं ते समोर आलं तर सत्य समोर येईल. चूक करणाऱ्याला पळून जायची संधी मिळणार नाही.'

बाॅलिवूडचे अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008 साली विनयभंगाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणानंतर तनुश्रीने न्यूज 18 सोबत खास बातचीत केली. यावेळी तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. 2008 मध्ये 'हाॅर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला. नानांनी माझ्या एका गाण्यामध्ये मला त्रास देणारे आक्षेपार्ह सीनही ठेवले होते.

नाना एवढ्यावर थांबले नाही. तर त्यांनी माझ्या कुटुंबालाही त्रास दिला. शूटिंगच्या नंतर मी घरी निघाले तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली होती असा आरोपही तनुश्रीने केला. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी सेटवर तणावपूर्ण वातावरण होते. एका कलाकाराने जर सेटवर मनसेचे कार्यकर्ते बोलावले तर काय वातावरण असेल असंही तनुश्रीने सांगितलं.

मी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती पण माझी तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. उलट माझ्याच विरोधात उलटी तक्रार दाखल करण्यात आली होती असंही तिने सांगितलं.

प्रियांका-निकची मुंबई भटकंती, Photos व्हायरल

First published: October 1, 2018, 2:33 PM IST

ताज्या बातम्या