मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘सामान्य मुलीला केलं सुपरस्टार’; आसावरी जोशींनी मानले पंकज कपूर यांचे आभार

‘सामान्य मुलीला केलं सुपरस्टार’; आसावरी जोशींनी मानले पंकज कपूर यांचे आभार

मराठी अभिनेत्रीनं मानले शाहिद कपूरच्या वडिलांचे आभार; त्या एका विनोदी मालिकेन केलं स्टार

मराठी अभिनेत्रीनं मानले शाहिद कपूरच्या वडिलांचे आभार; त्या एका विनोदी मालिकेन केलं स्टार

मराठी अभिनेत्रीनं मानले शाहिद कपूरच्या वडिलांचे आभार; त्या एका विनोदी मालिकेन केलं स्टार

    मुंबई 6 मे: आसावरी जोशी (Asawari Joshi) या मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. आज आसावरी यांचा वाढदिवस आहे. 56 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Asawari Joshi birthday) आसावरील यांनी फार कमी वेळात यशाचं शिखर गाठलं असं म्हटलं जातं. परंतु या याशाचं श्रेय त्या अभिनेता, दिग्दर्शक पंकज कपूर (Pankaj Kapur) यांना देतात. त्यांच्यामुळेच त्यांना हिंदी मनोरंजनसृष्टीतही आपले पाय रोवता आले. पाहूया त्यांनी सांगितलेला अवाक करणारा अनुभव. आसावरी जोशी यांचा जन्म 6 मे 1965 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपाणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांचं काम पाहून त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 1986 ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका साकारल्या. Fitness फंडा; मलायकाने केलेली ही आसनं पाहून तुम्हीही थक्क व्हाल परंतु त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. यांच्या ‘ऑफिस ऑफिस’ या मालिकेमुळं. 2001-04 या दरम्यान सुरु असलेल्या त्या विनोदी मालिकेत त्यांनी उशा ही व्यक्तिरेखा साकारली होती. अन् ही व्यक्तिरेखा त्याकाळी तुफान गाजली. पंकज कपूर यांच्या या मालिकेमुळंच आसावरी जोशी हे नाव घराघरात पोहोचलं असं त्या म्हणाल्या. पुढे या मालिकेतून मिळालेल्या अफाट लोकप्रियतेच्या जोरावर त्यांना अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अगदी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. अन् या मिळालेल्या यशाचं मोठं श्रेय त्या पंकज कपूर यांना देतात.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    पुढील बातम्या