शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यन खान तब्बल २७ दिवस तुरुंगात होता. एका क्रूझ पार्टीमधून त्याला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यांनतर तो कोणत्याच सार्वजनिक ठिकाणी दिसून आला नव्हता. परंतु आज आयपीएलच्या बोलीमध्ये आर्यन खान पहिल्यांदाच दिसून आला आहे. यावेळी आर्यनसोबत बहीण सुहाना खानसुद्धा आहे. सुहाना सध्या परदेशात अभिनयाचं शिक्षण घेत आहे. आर्यन खान आणि सुहाना यांच्यात फारच छान बॉन्डिंग आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती बिघडली होती.