मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एअरपोर्टवर चाहत्याने केलं असं काही की Aryan Khan नेही केला सलाम

एअरपोर्टवर चाहत्याने केलं असं काही की Aryan Khan नेही केला सलाम

 बॉलिवूडचा किंग खान कायम चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून त्याचा मुलगा आर्यन खानही चर्चेत आहे. आर्यनचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आले होते. तेव्हापासून  तो सतत चर्चेत असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 16 सप्टेंबर: बॉलिवूडचा किंग खान कायम चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून त्याचा मुलगा आर्यन खानही चर्चेत आहे. आर्यनचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आले होते. तेव्हापासून  तो सतत चर्चेत असतो. अशातच स्टार किड असणाऱ्या आर्यन खानचा चाहता वर्ग काही कमी नाही. आर्यन खान नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी आर्यनसाठी चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर्यन खान मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. अचानक एक फॅन समोर येतो आणि त्याला लाल गुलाब देतो. आर्यनही ते गुलाब प्रेमाने घेत असल्याचं दिसत आहे. इतकेच नाही तर पुढे गेल्यावर तो पुन्हा एकदा मागे वळून त्या चाहत्याला सलाम करतो. यावेळी आर्यनचा सलाम पाहून अनेकांना शाहरुख खानचीच आठवण झाली.

एअरपोर्टवर काहींनी तर आर्यनच्या हाताचं चुंबनही घेतल्याचं दिसून आलं. आर्यन खानने एअरपोर्टवर चाहत्यांसोबत फोटोही काढले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आर्यन खान ट्रेंड होत असलेला पहायला मिळत आहे. शिवाय त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी अभिनेत्री सजल एलीही आर्यन खानची फॅन आहे. तिनं नुकताच आर्यन खानचा फोटो तिच्या स्टोरीला ठेवला होता. सजलने तिच्या क्यूट पोस्टद्वारे आर्यनवरचे तिचे प्रेम व्यक्त केले. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. अनेकांनी या पोस्टवर पसंती दर्शवली.

First published:

Tags: Aryan khan, Bollywood, Shahrukh khan, Social media