जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Jubin Nautiyal: जुबिन नौटियालवर संतापले लोक, होतेय अटकेची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण?

Jubin Nautiyal: जुबिन नौटियालवर संतापले लोक, होतेय अटकेची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण?

Jubin Nautiyal:  जुबिन नौटियालवर संतापले लोक, होतेय अटकेची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण?

गायक जुबिन नौटियाल हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. जुबिनने आपल्या आवाजाने लोकांना भुरळ पाडली आहे. सध्या जुबिन नौटियाल ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 सप्टेंबर-   गायक जुबिन नौटियाल हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. जुबिनने आपल्या आवाजाने लोकांना भुरळ पाडली आहे. सध्या जुबिन नौटियाल ट्विटरवर ट्रेंड होत आहे. परंतु  गायक चांगल्या कारणासाठी नव्हे तर एका धक्कादायक गोष्टीमुळे ट्रेंड होत आहे. ट्विटरवर #arrestjubinnautiyal हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर गायकाला अटक करण्याची मागणी केली जात आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. ‘राता लंबियाना’, ‘दिल गलती कर बैठा है’ यांसारखी सुपरहिट गाणी गाऊन प्रसिद्धीझोतात आलेला तरुण गायक म्हणजे जुबिन नौटियाल होय. आपल्या दमदार, रोमँटिक आवाजाच्या जोरावर जुबिन तुफान लोकप्रिय बनला आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. जुबिन सतत लाईव्ह कॉन्सर्ट आणि इव्हेन्ट करत असतो. परंतु जुबिन सध्या आपल्या आगामी कॉन्सर्टमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. गायक केवळ ट्रोलच होत नाहीय तर त्याला अटक करण्याची मागणीदेखील केली जात आहे. जुबिन नौटियालने नुकतंच सोशल मीडियावर आपल्या आगामी कॉन्सर्टचा एक पोस्टर शेअर केला आहे. हा पोस्टर पाहून चाहते भडकले आहेत. खरं तर, या पोस्टरवर असलेल्या ऑर्गोनायझरच्या नावावरुन हा वाद निर्माण झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी जुबिनच्या आगामी कॉन्सर्टचा पोस्टर शेअर करत दावा केला आहे की, जय सिंह हा देशाचा वाँटेड क्रिमिनल आहे. पोलीस गेली 30 वर्षे त्याचा शोध घेत आहेत. आणि त्याचं खरं नाव जय सिंह नसून रेहान सिद्दिक्की आहे.

जाहिरात

पोस्टवरील याच नावामुळे हा सर्व वाद सुरु झाला आहे. जय सिंहवर ड्रग्स तस्करी, खलिस्तान्यांना मदत करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. तसेच त्याचा आयएसआय या आतंकवादी संघटनेशीही संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. आणि अशा आरोपीसोबत कॉन्सर्ट करण्यावरुन चाहते जुबिनवर संतापले आहेत.आणि त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. **(हे वाचा:** Hrithik Roshan: मुलांसोबत सिनेमा पाहायला गेला हृतिक रोशन,मध्येच चाहत्याने केलं असं काही भडकला अभिनेता )

या पोस्टरवरुन सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. जुबिनला ट्रोल करत, तू एका देशद्रोहीसोबत कॉन्सर्ट कसा काय करू शकतोस?’ असं प्रश्न त्याला विचारले जात आहेत. हा एक गुन्हा असून जुबिनला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. इतकंच नव्हे तर काहींनी यामध्ये अरिजितच नावसुद्धा घेतलं आहे. अरिजितनेसुद्धा जय सिंहसोबत कॉन्सर्ट केला असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात