मुंबई, 15 फेब्रुवारी- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) सध्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असला तरी तो आपल्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. त्याची पत्नी मेहर जेसियापासून विभक्त झाल्यापासून तो गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला (Gabriella Demetriades) डेट करत आहे. गॅब्रिएला आणि अर्जुन यांना अरिक नावाचा एक मुलगाही आहे. परंतु अजूनही त्यांनी लग्न केलं नाहीय. अर्जुनने आपल्या बाळाच्या जन्माच्या तब्बल दोन वर्षांनंतर एका मुलाखतीत खुलासा केला की त्याला माहित आहे की गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सशी लग्न न करण्याच्या आणि मुलाला जन्म देण्याच्या त्याच्या निर्णयावर अनेक लोक प्रश्न विचारतील आणि त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळेच इतरांच्या विचाराकडे लक्ष न देता आपल्या आयुष्यातील आनंदी क्षणांचा आनंद घेण्याचा निर्णय आपण घेतल्याचं त्यानं सांगितलं आहे. अभिनेता अर्जुन रामपालला जेव्हा गॅब्रिएला डेमेट्रिएड्सशी लग्न करण्याच्या त्याच्या प्लॅनिंगबद्दल जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा त्याने सांगितलं की त्यांना असं वाटतं की ते आधीच विवाहित आहेत कारण त्यांची मन जुळली आहेत. त्यानं असंही म्हटलं की त्यांना त्यांचं नातं सिद्ध करण्यासाठी कोणत्याही कागदी पुराव्यांची आवश्यकता नाही. अर्जुन आणि पहिली पत्नी मेहर यांना मायरा आणि माहिका या दोन मुली आहेत.
अर्जुल रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स एकेमकांसोबतच्या त्यांच्या सुंदर क्षणांची आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. गॅब्रिएला इंस्टाग्रामवर विविध पोस्ट करते, ज्यापैकी काही सेल्फ केयरबाबत असतात. अलीकडेच तिनं त्वचेच्या काळजीबद्दल एक व्हिडिओ (Gabriella Demetriades Video) शेअर केला होता. ज्याबद्दल काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलदेखील केलं होतं.
हा व्हिडीओ पाहून गॅब्रिएलाच्या लूकवर एका युजरने कमेंट केल्यावर ती रिप्लाय करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. तिनं युजरला इतकं समर्पक उत्तर दिलं की त्याला पुढे काहीच बोलता आलं नाही. एका यूजरने कमेंट करत लिहिलं होतं की, ‘तुमचे ओठ बघून मधमाशीने दंश केल्यासारखं वाटतं. मधमाशीच्या दंशाशिवाय तुम्हाला चांगलं का वाटत नाही?यावर सडेतोड उत्तर देत गॅब्रिएलाने लिहिलं होतं, ‘हाहाहा… पण खरच हा मधमाशीचा दंश नाहीय, हे माझे नैसर्गिक ओठ आहेत’.