मुंबई, 16 ऑक्टोबर- ‘उंचाई’ चित्रपट रिलीजसाठी पूर्णपणे सज्ज आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटातील 5 मुख्य पात्रांचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले होते. दरम्यान आता राजश्रीने आपल्या या आगामी चित्रपटातील सर्वात खास आणि बबली व्याक्तीरेखा असणाऱ्या अभिनेत्री परिणीती चोप्रा चं पोस्टर शेअर केलं आहे. अभिनेता अर्जुन कपूर ने परीचा हा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करत तिच्यासाठी एक खास पोस्टसुद्धा लिहली आहे. परिणीती चोप्रा आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच राजश्री प्रोडक्शनसोबत काम करत आहे. सूरज आर बडजात्या दिग्दर्शित, महावीर जैन फिल्म्स आणि बाउंडलेस मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री प्रॉडक्शनद्वारे निर्मित, ‘उंचाई’ हा परिणिती चोप्राचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. परिणीतीने ‘उंचाई’ चित्रपटाच्या सेटवरच बॉलीवूडमध्ये आपल्याला 10 वर्षे पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशनसुद्धा केलं आहे. इतकंच नव्हे तर परिणीतीने ‘उंचाई’ चित्रपटादरम्यानचा तिचा अनुभव ‘फिल्म स्कूल’ म्हणून संबोधला आहे. ‘उंचाई’ चित्रपटाबाबत अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत होती. **(हे वाचा:** Code Name Tiranga Collection: परिणीती चोप्राचे 11 वर्षात 9 फ्लॉप चित्रपट; ‘कोड नेम तिरंगा’ वर भविष्य अवलंबून ) चित्रपटातील इतर सर्व व्यक्तीरेखांच्या पोस्टर्सप्रमाणे, परिणीतीचा ‘उंचाई’मधील लुकदेखील दोन भागांमध्ये विभागलेला आहे. या चित्रपटात परिणीती ट्रेक गाईडच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. या पोस्टरमध्ये तिच्या डोळ्यात जिद्द आणि आत्मविश्वास दिसून येत आहे. पोस्टरच्या दुसऱ्या झलकमध्ये परिणीतीच्या चेहऱ्यावर असलेला आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.परिणीतीची टॅगलाइन अशी आहे – स्वांतत्र्य हीच तिची एकमेव प्रेरणा. या चित्रपटात परिणीतीला अनेक दिग्गज कलाकारांसोबत पाहणं खरोखरच रंजक असणार आहे.
अर्जुन कपूर पोस्ट- ‘ती माझी पहिली सहकलाकार आहे. ती माझी पहिली नायिका आहे. आणि हा तिचा पहिला #Rajshri चित्रपट आहे. हे सर्व सुंदर प्रथमच आहे. हे खास तुझ्यासाठी आहे परी!मनापासून, मी माझ्या प्रिय मैत्रिण परिणीतीला #Uunchai मधून श्रद्धा गुप्ता म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे… सूरज बडजात्या यांचा हा खास चित्रपट. 11 नोव्हेंबर २०22 रोजी प्रदर्शित होणार आहे. टीम ‘उंचाई’ ला प्रेम आणि शुभेच्छा. असं म्हणत अर्जुन कपूरने परिणीतीबाबत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
परिणीतीच्या आजच्या पोस्टरसह, सर्वांच्या नजरा आता 18 ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागल्या आहेत. राजश्रीने एकामागून एक लाँच केलेले पात्रांचे पोस्टर्स लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत आणि आता ट्रेलरमध्ये काय होणार हे पाहण्यासाठी चाहते या क्षणाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्ता, परिणिती चोप्रा, डॅनी डेन्झोंगपा आणि नफिसा अली यांच्या मुख्य भूमिका आहेत.