मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Arijit Singh च्या कॉन्सर्टची किंमत 16 लाखांपर्यंत; चाहते म्हणाले 'त्यापेक्षा गाणं ऐकून एकट्यात रडू'

Arijit Singh च्या कॉन्सर्टची किंमत 16 लाखांपर्यंत; चाहते म्हणाले 'त्यापेक्षा गाणं ऐकून एकट्यात रडू'

अरिजीत सिंह

अरिजीत सिंह

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन सोडणारा गायक म्हणजे अरिजीत सिंह. त्याच्या आवाजाचे लाखोंवर चाहते आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 26 नोव्हेंबर : आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन सोडणारा गायक म्हणजे अरिजीत सिंह. त्याच्या आवाजाचे लाखोंवर चाहते आहेत. त्याचा आवाज ऐकण्यासाठी त्याचे चाहते खूप धडपड करत असतात. अरिजीतला त्याच्या आवाजाच्या जादूने लोकप्रियताच्या शिखरावर बसवलं आहे. त्याच्या एका कॉन्सर्टसाठी लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. अशातच अरिजीत येत्या नव्या वर्षात म्हणजेच जानेवारीमध्ये कॉन्सर्ट घेणार आहे. या कॉन्सर्टची फी ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

अरिजीत सिंह पुढच्या वर्षी जानेवारीत पुण्याच्या द मिल्समध्ये कॉन्सर्ट करणार आहे. त्याच्या या कॉन्सर्टसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र तिकिटांच्या दरांमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. 900 ते तब्बल 16 लाखपर्यंत या कॉन्सर्टचं तिकीट असणार आहे. याविषयी चाहते ट्विट करत नाराजी व्यक्त करत आहेत.

तिकीट-बुकिंग साईटनुसार, प्रीमियम लाऊंज वनच्या तिकीटांची किंमत तब्बल 16 लाख रुपये आहेत. त्यात 40 खुर्च्या बसू शकतात. अनलिमिटेड अन्न आणि प्रीमियम मद्य असेल. यात उपस्थितांसाठी स्टार्टर्स, मेन कोर्स देखील असतील. मोकळ्या एरियामध्ये किंमती 999, प्रीमियम लाऊंज 2 ची किंमत 14 लाख रुपये, 3 ची किंमत 12 लाख रुपये आणि चारची किंमत 10 लाख रुपये आहेत. यात किमान लाऊंज 2 मध्ये 40, 3 आणि 2 मध्ये 30 सीट्स असणार आहे. हे पाहून चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

'मला अरिजित सिंग आवडतो पण मी इतका खर्च करणार नाही, ऐवढे पैसे नाही देऊ शकत, एवढ्या पैश्यात साब्याबाचीचा लेहंगा येईल, त्यापेक्षा गाणं ऐकून एकांतात रडू', अशा आशयाचे अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना तिकिटांची किंमत पाहून धक्काच बसला आहे.

दरम्यान, संगीत क्षेत्रात अरिजीतचे नाव खूप आदराने घेतले जाते. साधा स्वभाव आणि मनाला भिडून जाणाऱ्या आवाजाने अरिजीतने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मोठमोठे सुपरस्टारही अरिजीतच्या गाण्यांचे चाहते आहेत. त्याच्या आवाजामुळे अनेक चित्रपटांतील गाणी आणि चित्रपट हिट होतात. त्याच्या अनेक क्रेझी चाहतेही पहायला मिळतात.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Playback singer