मलायकाशी घटस्फोटावर अरबाज म्हणतो, आमच्यात सर्वकाही ठिक होतं पण....

मलायका गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज सध्या जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

  • Share this:

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाला दोन वर्ष झाली. मलायका आणि अरबाजने त्यांचं 18 वर्षांचं लग्न मोडत आपले मार्ग वेगळे केले. घटस्फोटाचं मूळ कारण दोघांनी कधीही सांगितलं नाही. पण आता अनेक वर्षांनी अरबाजने प्रसारमाध्यमांसमोर आपलं मन मोकळं केलं.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाला दोन वर्ष झाली. मलाया आणि अरबाजने त्यांचं 18 वर्षांचं लग्न मोडत आपले मार्ग वेगळे केले. घटस्फोटाचं मुळ कारण दोघांनी कधीही सांगितलं नाही. पण आता अनेक वर्षांनी अरबाजने प्रसारमाध्यमांसमोर आपलं मन मोकळं केलं.

नुकताच अरबाज म्हणाला की, सर्वकाही ठीक सुरू असताना अचानक नातं तुटलं. अरबाजनं नुकतंच एका शोमध्ये कुटुंब, काम आणि मलायका अरोराबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मलायकासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला की, ‘सगळं काही ठीक वाटत होतं पण हे तुटलं. जर नात्यात काही चुकीचं आहे तर मला वाटतं की दोन लोकांनी आपल्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्यावा.’

जेव्हा अरबाजला विचारण्यात आले की, तो लग्न करण्याचा सल्ला देईल का? याबद्दल बोलताना अरबाज म्हणाला की, ‘हो का नाही. लग्न परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. लोक मरण्यापूर्वी पूर्ण जगून घेण्याचा प्रयत्न करतात. पण वेळेनुसार बदललंही पाहिजे. आताच घटस्फोट होतात असे नाही भूतकाळातही अशा अनेक घटना घडल्या आहेत.’

याआधी मलायकाने करिना कपूरच्या शोमध्ये म्हटलं होतं की, ‘या लग्नात मी आणि अरबाज दोघंही आनंदी नव्हतो. याचा परिणाम कुटुंबाच्या इतर सदस्यांवरही पडत होता. घटस्फोटानंतर गोष्टी बदलतात आणि तुम्हाला समाजाचा सामना करावा लागतो. या सगळ्यात महिलांपेक्षा पुरुष सहज निसटतात. मी पुरुषांवर कोणत्याही प्रकारचा आरोप करत नाहीये, पण हे खरंय.’

याआधी मलायकाने करिना कपूरच्या शोमध्ये म्हटलं होतं की, ‘या लग्नात मी आणि अरबाज दोघंही आनंदी नव्हतो. याचा परिणाम कुटुंबाच्या इतर सदस्यांवरही पडत होता. घटस्फोटानंतर गोष्टी बदलतात आणि तुम्हाला समाजाचा सामना करावा लागतो. या सगळ्यात महिलांपेक्षा पुरुष सहज निसटतात. मी पुरुषांवर कोणत्याही प्रकारचा आरोप करत नाहीये, पण हे खरंय.’

मलायका गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज सध्या जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

मलायका गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज सध्या जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 08:21 AM IST

ताज्या बातम्या