मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हे काय? अनुराग कश्यपने अनिल कपूर यांच्या तोंडावर फेकलं पाणी... AK vs AK

हे काय? अनुराग कश्यपने अनिल कपूर यांच्या तोंडावर फेकलं पाणी... AK vs AK

अनुराग कश्यप आणि अनिल कपूर (AK vs Ak) यांचा वाद गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच रंगतोय. जाणून घेऊयात नक्की काय प्रकरण आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई 08 डिसेंबर: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अनिल कपूर हे दोघंही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अनिल कपूर अनुराग कश्यपला बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्रॉड असं म्हणतो. त्यानंतर रागवलेल्या अनुरागने त्याच्या तोंडावर पाणी फेकलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडीओ नेटफिल्क्सवर प्रदर्शित होणाऱ्या Ak Vs Ak चा आहे. ट्रेलरमध्ये हा वाद नक्की कशामुळे झाला हे समजलेलं नसलं तरी चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला लागली आहे. त्यांची खरंच भांडणं झाली आहेत का? आणि नक्की कशावरुन भांडणं झाली आहेत हे समजणं कठीण जात आहे. ट्रेलरची सुरुवात होते तेव्हा ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात. दरम्यान अनुराग आणि अनिल कपूर एकत्र मिळून एक फिल्म बनवत आहेत. ज्यामध्ये सोनम कपूरचं अपहरण झाल्याचं दाखवण्यात येतं. आणि अनुरागने अनिल कपूरला फक्त दहा तासांचा अवधी दिलेला असतो. या दहा तासांमध्ये अनिल कपूरला आपल्या मुलीला शोधायचं असतं. आता सोनमचा शोध लागतो का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. या फिल्ममध्ये अनिल कपूर, अनुराग कश्यप, सोनम कपूरसह (Sonam Kapoor) बोनी कपूर यांनीही काम केलं आहे. या फिल्मचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने यांनी केलं आहे. त्यांनी यापूर्वी  2018मध्ये प्रदर्शित झालेला ‘भावेश जोशी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. AK vs AK हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.
First published:

Tags: Netflix, Trailer

पुढील बातम्या