मुंबई, 12 जून- अनुपमा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमुळे रुपाली गांगुली घराघरात पोहचली. मालिकेचा या मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर या मालिकेची नेहमी चर्चा रंगलेली असते. मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नासोबत रुपालीची जोडी चांगलीच पसंत केली जात आहे. गौरव टीव्हीसोबतच सोशल मीडियावरही सक्रीय असतो . नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने फीच्या विषमतेवर भाष्य केले. कामाबद्दलचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, असे त्याचे मत आहे. त्यानुसार चांगली फी मिळते, असे दोखील तो म्हणाला. शेवटी आपली कला हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली असते. गौरव खन्नानं हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना सांगितले की, फीमध्ये तफावत आहे की नाही हे मला समजत नाही. मला माहित आहे की आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असले पाहिजे. तुम्ही जे काही पैसे घरी घेऊन जात आहात ते योग्यच असेल. मी याबाबतीत अतिशय व्यावहारिक व्यक्ती आहे. प्रत्येक प्रोफेशनमध्ये चढ-उतार हे असतातचं. वाचा- सनी देओल अन् बिग बींमध्ये आहे 36 चा आकडा! या कारणामुळं बच्चन कुटुंबावर आहे नाराज शेवटी आपल्या कामाच्या आधारे फी ठरवली जाते, असेही गौरव खन्नाने सांगितले. कोणत्याही क्षेत्रात टिकून राहण्याची एकमेव गोष्ट आपल्याला अनुमती देते ती म्हणजे आपली प्रतिभा. पैसे कमावण्यासाठ लोकप्रियता आणि कौतुक अधिक फायदेशीर आहे. मला वाटते की, मी कमावलेल्या व्यक्तीच्या दुप्पट किंवा पाचपट कमाई करणाऱ्या या व्यक्तीपेक्षा हे बरेच जास्त आहे, असा देखील यावेळी तो म्हणाला. गौरव खन्ना म्हणाला, ‘प्रेक्षकांचे प्रेम आणि माझ्या अभिनयासाठी होणारं कौतुक यांची तुलना पैशाच्या मूल्याशी होऊ शकत नाही. मी कधीही माझ्या कामाचे तसे मूल्यमापन केलेले नाही. माझ्या प्रेक्षकांना मी आवडतो की नाही या दृष्टिकोनातून मी नेहमीच याकडे पाहिलं आहे. हीच सर्वात मोठी कमाी आहे जी आपण घरी नेऊ शकतो कारण ही कमाई कधीच खर्च होत नसते, हेही तितकचे खरे आहे.
इतकी फी आहे गौरव खन्नाची? अनुपमा मालिच्या एका एपिसोडसाठी गौरव दीड लाख रुपये घेतो. तर अनुपमाची भूमिका साकारणारी रुपाली गांगुली एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये घेते.