मुंबई, 18 जुलै : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari). अंकुशनं त्याच्या अभिनयानं अनेकांना भुरळ घातली आहे. प्रत्येक भूमिकेत अंकुश एकदम परफेक्ट दिसतो. अंकुशच्या निभावलेल्या अनेक भूमिका वाखानण्याजोग्या आहेत. त्याचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. अशातच अंकुश पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. अंकुशनं इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या आगामी चित्रपटाचा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतोय. अंकुश चौधरीनं त्याच्या आगामी चित्रपटाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘ऑटोग्राफ’, असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याविषयी अंकुशनं पोस्टमध्ये सांगितलंय. अंकुशनं व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी… ‘ऑटोग्राफ’, चित्रपट 30 डिसेंबर 2022 पासून तुमच्या भेटीला येणार आहे. जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं अंकुशनं म्हटलं आहे. हेही वाचा - Thipkyanchi Rangoli: वीणा जगतापनंतर ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये नव्या पात्राची एंट्री! हास्य जत्रेत प्रेक्षकांचं केलंय तुफान मनोरंजन “काहीही कारण नसताना, कोणतीही ओळख नसताना काही माणसं भेटतात आणि त्यांची आठवण आपल्या मनावर कायमची कोरुन जाते. ती माणसं, ते नाव, त्यांचा तो ठसा, कायम जपून ठेवावा वाटतो एखाद्या ऑटोग्राफसारखा.. कारण आपण ऑटोग्राफ मागून घेतो तो कायम जपून ठेवण्यासाठी”, हा चित्रपटाचा इन्ट्रो अंकुशच्या आवाजातला असून चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढवत आहे. ‘ऑटोग्राफ’ चित्रपटामध्ये अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे, मानसी मोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेंनमेंट प्रस्तुत, एसटीव्ही नेटवर्क्स निर्मित, एक जपून ठेवावी अशी लवस्टोरी…! ‘ऑटोग्राफ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संजय छाब्रिया, आश्विन आंचन निर्मित हा चित्रपट 30 डिसेंबर चित्रपटगहात पाहता येणार आहे. या आगामी चित्रपटाच्या पोस्टवर सध्या अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसतायेत.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी ‘ती सध्या काय करतेय’ चित्रपटाचा फिल येत असल्याचं म्हटलं आहे. काहींनी म्हटलं की 2016 साली हा चित्रपट जाहीर झाला होता तेव्हापासून वाट पाहत आहे. भरभरुन कमेंटचा वर्षाव पाहता चाहते चित्रपटासाठी अधिक उत्साहित असल्याचं दिसतंय. त्यामुळे या चित्रपटात काय काय पहायला मिळणार, कोणत्या नव्या भूमिकेंची ओळख होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.