
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकताच आपला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

लग्नानंतर आता अभिनेत्री आपल्या प्रत्येक प्री-वेडिंग सेरेमनीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने आपल्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले होते.

त्यानंतर आज अभिनेत्री अंकिता लोखंडेने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मेंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.यामध्ये अभिनेत्री सह सर्वच लोक फुल्ल ऑन धम्माल करताना दिसून येत आहेत.

अंकिता लोखंडेने आपल्या मेंदीत पीच कलरचा इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. सोबतच डायमंडची ज्वेलरीदेखील घातली होती. या लूकमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये आपली मराठीमोळी नवरी अंकिता फारच आनंदी दिसून येत होती. ती प्रत्येक क्षण मोठ्या उत्साहाने एन्जॉय करताना दिसून येत आहे.

अभिनेत्री मेंदी काढता-काढताच आनंदाने नाचतसुद्धा आहे. तर इतर फोटोंमध्ये ती विकीसोबत सर्वांनाच नाचवत आहे.

अंकिता आणि विकी 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले होते. दोघांनी मुंबईतील ग्रँड हयात या आलिशान हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली होती.

विकी आणि अंकिता एकमेकांना 4 वर्षांपासून डेट करत होते. त्यांनी अनेकवेळा सोशल मीडियावरून आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.




