मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'कोण रिया? मी नाही ओळखत!', सुशांतच्या मृत्यूनंतर दीड वर्षाने अंकिता लोखंडेचा नवा पवित्रा

'कोण रिया? मी नाही ओळखत!', सुशांतच्या मृत्यूनंतर दीड वर्षाने अंकिता लोखंडेचा नवा पवित्रा

अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) आपण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) ओळखतच नसल्याचं सांगितलं आहे.

अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) आपण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) ओळखतच नसल्याचं सांगितलं आहे.

अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) आपण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) ओळखतच नसल्याचं सांगितलं आहे.

मुंबई, 03 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) याच्या मृत्यूला आता 15 महिने झाले आहेत. त्याच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही (Ankita Lokhande) तिचा उल्लेख केला होता. पण आता मात्र अंकिताने रियाला ओळखण्यासच नकार दिला आहे.

आपण रियाला ओळखत नाही, सुशांत आणि तिच्या नात्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असं अंकिता लोखंडेने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. रियासोबत बिग बॉस 15मध्ये (Big Boss 15) सहभागी होणार असल्याच्या वृत्ताचंही तिने खंडन केलं आहे.

ई-टाइम्सशी बोलताना अंकिताने सांगितलं, 'मी रिया चक्रवर्तीसह बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याच्या वृत्ताबद्दल माझ्याकडे विचारणा केली जात आहे; मात्र हे वृत्त खरं नाही. ही निव्वळ अफवा आहे.'

हे वाचा - सिद्धार्थ शुक्ला पंचत्वात विलीन; कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना अश्रू आवरणं कठीण

'मी रिया चक्रवर्तीला ओळखत नाही. मी तिला कधीही भेटलेले नाही किंवा तिच्याशी माझं कधी बोलणंही झालेलं नाही. सुशांत आणि रिया यांच्यात नातेसंबंध होते, हे मला माहिती नव्हतं. अर्थात मी त्याबद्दल कधीच काही बोलले नव्हते. तो जिथे कुठे असेल, तिथे भगवंताचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू देत. मी कोणाशीही संबंध बिघडवलेले नाहीत. कारण माझे कोणाशीही संबंध नाहीत. ज्याच्याशी माझे संबंध होते, त्याच्यासाठी मी भूमिका घेतली होती,' असं अंकिताने मुलाखतीत स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर ट्रोलिंग केलं जात असल्याबद्दल विचारलं असता ती म्हणाली, 'लोकांना जेव्हा वाटतं तेव्हा ते मला देवी बनवतात आणि डोक्यावर घेतात. तसंच, त्यांची मर्जी संपली की उतरवतात. मृत्युआधीची चार वर्षं सुशांत माझ्या आयुष्यात नव्हता. अन्य कोणावरचा राग माझ्यावर काढण्यात काहीच अर्थ नाही.'

हे वाचा - हार्ट प्रॉब्लेम आणि डिप्रेशनचा सामना करतायत सायरा बानू; एन्जिओग्राफीला दिला नकार

अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंह राजपूत जवळपास सहा वर्षं रिलेशनशिपमध्ये (Relationship) होते. 2016 साली त्यांचा ब्रेकअप (Breakup) झाला होता. त्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीला डेट करत होता. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर, त्याच्या मृत्यूच्या कारणाचा योग्य तपास व्हावा, त्याला न्याय मिळावा, अशी मागणी अंकिताने वारंवार केली. या प्रकरणी बऱ्याच जणांची चौकशी झाली. सुशांतचा मृत्यू आणि ड्रग्ज कनेक्शन या अनुषंगाने रिया चक्रवर्तीसह काही जणांना अटकही झाली होती.

First published:

Tags: Ankita lokhande, Entertainment, Rhea chakraborty, Sushant Singh Rajput